पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[८]

 साहसवृत्तीस उत्तेजन मिळाले.याचेयोगानें आशिया व युरोप यांच्यामध्यें दळणवळण वाढून या दोन खंडांमध्यें जोराचा व्यापार सुरू झाला व आशिया व हिंदुस्थान येथील उत्तम कलाकौशल्याचा माल युरोपमध्यें जाऊन तेथें लोकांना त्याची गोडी लागली व तसले कारागिरी धंदे युरोपांत सुरू करण्याची प्रवृत्ति सुरू झाली. याप्रमाणें धर्मयुद्धाचा मृळ उद्देश सिद्धीस गेला नाहीं तरी इसापनीतींतील शेतांत पुरून ठेवलेल्या संपत्तीच्या शोधार्थ शेत नांगरणा-या शेतक-याच्या मुलांप्रमाणें युरोपियन राष्ट्रांचा या धर्मयुद्धापासून फार फायदा झाला.
 याप्रमाणें युरोपामध्यें व्यापारधंदा वाढत असतांनाच त्यांत भर पाडणारी आणखी कारणें उत्पन्न झालीं. छापण्याच्या कलेचा शोध लागल्यामुळें ज्ञानप्रसार सामान्य लोकांत सुद्धां झपाट्याने होऊं लागला. ज्योतिष, रसायन वगैरे शास्त्रांत जे नवीन शोध लागले त्यामुळे ज्ञानलालसा वाढून सर्व शास्त्रांची भराभर वाढ होत गेली. धर्मयुद्धानें आधींच नौकानयनास व लोकांच्या दर्यावर्दीपणास उत्तेजन मिळालें होतें, त्यांतच होकायंत्राच्या शोधाची भर पडून युरोपांतील लोकांच्या धाडसास व साहसास अधिकच जोर आला व एकीकडे कोलंबसानें अमेरिका खंड शोधून काढिलें व त्याला हिंदुस्थानचा पश्चिम किनारा समजून हिंदुस्थान असें नांव दिलें. तर दुसरीकडे बास्कोडिगामा यानें आफ्रिका ओलांडून केप ऑफ गुड होपच्या मार्गे ख-या हिंदुस्थानचा जलमार्ग शोधून काढिला. या दोन शोधांमुळे युरोपांतील जुन्या व्यापारी मार्गावरील राष्ट्रांचें व शहरांचें औद्योगिक व व्यापारी वर्चस्व कमी कमी होत जाऊन ते स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इंग्लंड व हॉलंड या अटलांटिक महासागरावरील राष्ट्रांना,येऊं लागले. शिवाय या राष्ट्रांनीं आफ्रिकेंत व विशेषतः अमेरिकेंत आपल्या वसाहती केल्या व या वसाहतींच्या सर्व व्यापार या देशांच्या ताब्यांत आला. याप्रमाणें युरोपांतील वर निर्दिष्ट केलेल्या देशांमध्यें उयोगधंद्यांची व व्यापारउदीमाची प्रगति होऊं लागून त्यांची संपत्ति वाढत चालली. त्यांतल्यात्यांत अमेरिकेमध्यें सोन्यारुप्याच्या खाणींचा शोध लागला व या पैशाच्या लोभानें हजारों लोक अमेरिकेंत जाऊ लागले व गवर हाऊन परत येऊं लागले. यामुळें युरोपखंडांत सोन्यारुप्याचा ओघ सुरू झाला व तिकडून पुढें तो ओघ हिंदुस्थानाकडेही वळला. युरोपां-