पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१७८]

निराळ्या पद्धतीने समाजामधील वर्गात संपत्तीची वांटणींही निरनिराळ्या तऱ्हेने होते. शिवाय शेतकी हा संपत्तीच्या उत्पत्तीचा एक बराच महत्वाचा धंदा असल्यामुळे शेतकीच्या निरनिराळ्या पद्धतीचा अर्थशास्त्रदृष्ट्या विचार करणे अवश्य आहे. म्हणून पुढील भागांत प्रथमतः युरोपांतील जमीनधाऱ्याच्या निरनिराळ्या प्रकारांचे वर्णन देऊन धनोत्पादनाच्या व लोकहिताच्या दृष्टीने कोणती पद्धत चांगली, या गोष्टीचा विचार करव वाचा वेत आहे; नंतर हिंदुस्थानांतील निरनिराळ्या पद्धतींचा याच दृष्टीने विचार करून मग वांटणीच्या अवशिष्ट प्रश्नाकडे वळण्याचा मानस आहे.

भाग सातवा.
जमीनधाऱ्याच्या पद्दती.

 सर्व जगात सर्व काळीं जमीन ही संपत्तीची मुख्य जनयित्री असल्या मुळे जमीनधाऱ्याच्या पद्धती फार महत्वाच्या गणल्या जात असत. युरोपांत ग्रीक व रोमन लोकांमध्ये जमिनी ह्या खासगी मालकीच्या असत. नागरिक हे जमिनीचे पूर्ण मालक असत. परंतु या काळी गुलामगिरीचा प्रघात असल्यामुळे ज्याप्रमाणे इतर धंदे गुलामच करीत त्याप्रमाणे शेताची लागवडही गुलामच करीत. नागरिक देखरेख मात्र करीत. पहिल्य पहिल्यांदा शेताचे आकार साधारण बेताचेच असत; परंतु पुढेपुढे शेताचे आकार मोठे मोठे होऊ लागले व नागरिकांना राजकीय कामामुळे शेताची प्रत्यक्ष देखरेख करतां येणेसुद्धांअशक्य झाले. यामुळे शेताची देखरेखही नागरिकांनी नेमलेल्या नोकरांकडे किंवा गुलामांपैकींच जास्त विश्वासाच्या गुलामाकडे दिली जाई व याचा परिणाम पहिल्यापेक्षां अनिष्ट झाला हे उघड आहे. रोमन राज्याच्या बाल्यावस्थेत रोमन लोक स्वतः शेतें लागवडीस आणीत व स्वतः शेतें कसणे हे मानाचे समजले जात असे; परंतु पुढे तेर्येही सर्व लागवड गुलामांमार्फतच होऊ लागली. नागरिकांच्या मालकीची पुष्कळ एकर जमीन असे व मालकांच्या सामान्य देखरेखीखाली जमिनीची लागवड होत असे. या शेतकीच्या लागवडीच्या पद्धतीला दासंकृषि