पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१४९]

इतर देशांतील वस्तुस्थिति यांचा विरोध येऊं लागल्यामुळे रिकार्डोच्या उपपत्तीबद्दल पुष्कळ आक्षेप येऊं लागले.
 पहिला आक्षेप नवीन वसाहतींतील कॅरे या अमेरिकन ग्रंथकारानें काढला आहे. यानें असें सिद्ध केलें कीं,रिकार्डोची उपपत्ति आधीं नवीन वसाहतींना मुळींच लागू पडत नाहीं. कारण रिकार्डोच्या उपपत्तीचें एक प्रधान कलम असें आहे कीं, लोकवस्तीच्या वाढीबरोबर कमी मगदुराची जमीन लागवडीस येते ह्मणजे लागवडीची धार खालीं जाते व धान्याचे भाव वाढतात व जमिनीचा खंड वाढतो. परंतु नव्या वसाहतीमध्यें प्रथमतः जी जमीन लागवडीस येते ती किना-याजवळची हलकी, रेताळ जमीन असते किंवा जिच्या लागवडीला फारसें भांडवल लागत नाहीं अशी जमीन प्रायः लागवडीस येते. म्हणजे वस्तुतः कमी मगदुराची जमीन प्रथमतः लागवडीस येते व जसजशी लोकसंख्या वाढते व लोकांजवळ जास्त जास्त भांडवल जमतें तसतशी अांतील सपाट प्रदेशांतील उंची सुपीक जमीन लागवडीस येते. व याचे योगानें धान्याच्या किंमती लोकसंख्येच्या वाढीबरोबर न वाढतां उलट उतरतात. तेव्हां 'जास्त मगदुराकडून कमी मगदुराकडे' असा, जो लागवडीचा क्रम रिकार्डोनें दिला ऒहे ते मुळीं वस्तुस्थितीस धरून नाहीं असा कॅरेचा पहिला आक्षेप होता. रेिकार्डोच्या कैवा-यांनीं लागवडीच्या क्रमाचा मुद्दा इतका महत्वाचा नाहीं व ती जरी खरा नसला तरी त्यानें रिकाडींची उपपत्ति खोटी ठरत नाहीं असा कोटिक्रम लढविला आहे; परंतु रिकार्डोच्या ग्रंथांतील जो उतारा आम्हीं वर दिला आहे त्यावरून हा कोटिक्रम वृथा आहे असें ह्मणणें प्राप्त आहे. खरोखर पाहतां रिकार्डोला जमिनीला सुद्धां चढत्या पैदाशीचा नियम कांहीं काळपर्यंत लागू असतो हें तत्व ठाऊक नव्हतें; त्याची समजूत अशी होती कीं, जमिनीला प्रथमपासूनच उतरल्या पैदाशीचा नियम लागू आहे. यामुळें कोणत्याही देशामध्यें सर्वकाळीं देशाच्या भरभराटीबरोबर धान्याचे भाव वाढून मजूरदारांची स्थिति वाईट होत गेलीच पाहिजे असा सार्वत्रिक सिद्धांत त्यानें काढला. परंतु नवीन वसाहतीला हा नियम लागू नाहीं. उलट लोकवस्तीच्या वाढीनें धान्याचे भाव कमी होऊन मजूरदारांची सांपत्तिक स्थिति सुधारत जाते असें वसाहतीचा इति