पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१४३]

लागलीं आहेत तितक्या साधनांमध्यें किंवा त्या साधनांच्या मालकांमध्यें त्या संपत्तीची वांटणी व्हावी हें उघड आहे. आतां देशांतील संपत्तीला प्रत्यक्ष कारणें चार आहेत. तीं जमीन, श्रम, भांडवल व योजना; व या चार कारणांची मालकी असणारे समाजांत चार वर्ग असतात, ते मजूर, जमीनदार, भांडवलवाला व कारखानदार हे होत. या चार प्रमुखवर्गामध्यें संपत्तीची मुख्यतः वांटणी होते व याच वर्गांपासून समाजांतील इतर वर्गाना संपत्तीचा वांटा मिळतो. संपत्तीच्या वाढीस कारणीभूत होणारी राज्यव्यवस्था हिलाही संपत्तीचा एक वांटा मिळतो, परंतु सुधारलेल्या देशांत तो कराच्या रूपानें मिळतो, व या करांच्या तत्त्वांच्या व सरकारच्या जमाखर्चाचा विचार या ग्रंथाच्या पांचव्या पुस्तकांत स्वतंत्रपणें करावयाचा आहे. तेव्हां या ठिकाणीं आपल्याला संपत्तीच्या चार हिश्शांचा मुख्यत: विचार करावयाचा राहिला. ते हिस्से अगर वांटे ह्मणजे भाडें, मजुरी, व्याज व नफा हे होत. आतां प्रत्येक वांट्याच्या स्वरूपाचें व त्याच्या नियमांचें क्रमश: विवेचन पुढील चार भागांत करावयाचें आहे.

भाग तिसरा.
भाडें अगर खंड.

 सामान्य व्यवहारांत भाडें हा शब्द फार व्यापक अथनेिं वापरला जातो. कोणत्याही स्थावर व जंगम वस्तूची मालकी असलेला मनुष्य जेव्हां त्या वस्तूचा नियतकालिक उपयोग दुस-यास करण्यास देती तेव्हा तो त्या वस्तूबद्दल भाडें घेतो. उदाहरणार्थ:-घरवाला आपल्या घराबद्दल बिऱ्हाडकऱ्यापासून भाडें घेतो. टांगा किंवा गाडी यांच्या मालकास त्याच्या टांग्यांतून व गाडींतून प्रवास करण्याबद्दल प्रवासी जें देतो त्यालाही भाडेंच ह्मणतात. तसेंच जंगम वस्तु-भांडींकुंडीं, चटया, सतरंज्या, गालिचे, टेबलें, खुर्च्या वगैरे हजारों जिन्नस भाडयानें बाजारांत मिळतात, तेव्हां भाडें हें मालकीच्या वस्तूंबद्दल नियतकालिक उपयोगाकरितां दिलेला मोबदला