पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



अर्थशास्त्राचीं मूलतत्वें.


पुस्तक पहिलें.


भाग पहिला.


उपोद्धात.


अर्थशास्त्राचा इतिहास.


 एकोणिसाव्या शतकांतील जर कोणत्या एका शोधानें सर्व शास्त्रीय कल्पनांमध्यें मोठी क्रांति घडवून आणली असेल तर ती उत्क्रांतितत्त्वानें होय. डार्विननें प्रथम या तत्वाचा फक्त प्राणिशास्त्रांत उपयोग केला खरा, तरी पण त्यानें व कांहींसे त्याचे पूर्वींच हर्बर्ट स्पेन्सरनें तें तत्व सर्व विषयांस व सर्व शास्त्रांस सारखेंच लागू आहे असें सिद्ध केलें. तेव्हांपासूनच ऐतिहासिक पद्धतीला महत्व आलें व प्रत्येक शाखाचीं तात्विक व ऐतिहासिक अशीं दोन स्वतंत्र अंगें बनत चाललीं. पहिल्यामध्यें एखाद्या शास्त्राचीं मूलतत्वें, त्यावरून निघणारीं प्रमेयें, सिद्धांत व उपसिद्धांत यांचें सविस्तर विवेचन असावयाचें; व दुस-या अंगामध्यें त्या शास्त्राच्या उदयापासून तों पूर्णवाढीपर्यंतचा इतिहास असावयाचा. हा ऐतिहासिक भाग तात्विक भागांपेक्षां स्वाभाविकच मनोरंजक असून त्याच्यायोगानें शास्त्राचीं तत्वें व प्रमेयें सुलभ रीतानें समजूं लागतात. म्हणून अलीकडे प्रत्येक शास्त्राचे इतिहास प्रसिद्ध होत आहेत. तेव्हां हातीं घेतलेल्या शास्त्राच्या तत्वांचें व प्रमेयांचें सुलभ रीतीनें आकलन व्हावें अशा हेतूनें या उपोद्धातांत अर्थशास्त्राचा थोडक्यांत इतिहास देण्याचा विचार