पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११७]

लागतें. अशा स्थितीमुळें हिंदुस्थानांत लोकसख्या साक्षातू निग्रहानें कमी होते म्हणजे येथें मृत्यूचें प्रमाणही फार जबर आहे.
 वर दिलेल्या विवेचनावरून असें दिसून येईल कीं, जरी हिंदुसमाजाची सामाजिक स्थिति व चालीरीति युरोपांपेक्षां अगदीं निराळ्या आहेत तरी अन्न व लोकसंख्या यांचें समीकरण मॅलथसच्या तत्त्वाप्रमाणेंच घडून येत आहे. परंतु समाजांतील निरनिराळ्या जातींतील लोकांची सुधारणा करावयाची असल्यास त्यांच्यामध्यें जास्त उन्नत अशा राहणीची आवड उत्पन्न केली पाहिजे, याकरितां शिक्षण सार्वजनिक झालें पाहिजे व प्रौढपणों लग्न करण्याची व आपली स्थिति सुधारण्याकरितां लग्नाच्या बाबतींत कांहीं काळ आत्मसंयमन करण्याची भावना लोकांमध्यें उत्पन्न केली पाहिजे. याची पहिली पायरी म्हणजे प्रेौढविवाहाचा प्रचार सुरू झाला पाहिजे, व हें होण्यास मुलीच्या लग्नाची पराकाष्ठेची मर्यादा म्हणजे ऋतुप्राप्ति ही जी धार्मिक कल्पना आहे ती नाहींशी झाली पाहिजे. ही सुधारणा व हा कल्पनाविच्छेद सुशिक्षितांनीं आपल्या उक्तींनी व कृतींनी घडवून आणिला पाहिजे.

[भाग अकरावा.]
[भांडवलाची वाढ.]

 संपत्तीच्या उत्पत्तीच्या मूर्त कारणांचा विचार करतांना असें दाखविलें आहे कीं, समाजाच्या प्रथमावस्थेंत सृष्टीशक्ती व मानवी श्रम या दोहोंच्या साहाय्यानेंच संपत्ति उत्पन्न होते व भांडवल हें या दोहोंचा परिणाम आहे. तरी पण समाजाच्या परिणतावस्थेत या मागाहून आलेल्या कारणालाच प्राधान्य येतें. आतां या भांडवलाची देशांत वाढ कशी होत जाते हें पहावयाचें आहे. भांडवल हें संपत्तीचेच एक विशेष स्वरुप असल्यामुळे भांडवलाच्या वाढीचा प्रश्न म्हणजे पर्यायानें संपत्तीच्या वाढीचाच प्रश्न आहे व म्हणूनच या बिकट प्रश्नाबद्दल अजूनही अर्थशास्त्रज्ञांमध्यें बराच