पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/125

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११३]


आहे. व त्याच्या सिंहावलोकनाचें पर्यवसान असें आहे की, जसजसा। समाज सुधारत जातो तसतसा त्या समाजामध्यें साक्षात् निग्रहापेक्षां प्रतिबंधक निग्रहाचा प्रभाव जास्त जास्त होत जातो व असें होणें समाजांतील लाकाच्या कल्याणाच्या दृष्टीनं इष्ट आहे.
 रानटी स्थितींतील समाजांतील लोकसंख्या व अन्न यामधील समीकरण निरनिराळ्या त-हेच्या विपत्तींनी व व्यसनें, दुर्गुण व आपत्नी यांनीं घडून येतें. अंदुमानसारख्या किंवा टेराडेलफुगोसारख्या नापीक जमिनीत लोकांचा उद्योगसर्वस्व ह्मणजे जमिनींत व समुद्रांत मिळणारें स्वाभाविक अन्न मिळविणें हा होय. येथें त्यांच्या नेहमींच्या उपासमारीनें व सततच्या दुष्काळानें लोकसंख्या कमी होते, तर कोठे स्त्रीपुरुषांच्या व्यसनी संवयी व दुष्ट चालीरीती या विपत्तींनीं लोकसंख्या कमी होतेः तर कोष्ठं आपापसांतील भयंकर लढाया व आजन्म हाडवैर यांनीं लोकसंख्या कमी होते. सारांश, रानटी स्थितींतील समाजांत लग्रासंबंधीं दूरदर्शींपणाचा किंवा ब्रह्मचर्य या निग्रहाचा जोर नसतो. तर विपत्ति, व्यसन, गुन्हे वगैरे निग्रहाचा पगडा जास्त असती. परंतु समाज जसजसा ज्ञानवान् व सुधारलेला होत जातो तसतसा ब्रह्मचर्य हा नैतिक निग्रह प्रधान होत जातो व असें होण्यांतच समाजाचें हित आहे.
 मॅलथसच्या या मीमांसात्मक निबंधानें त्या काळच्या विद्वान् लोकांत अगदी गडबड उडवून दिली. पाद्री, धर्मोपदेशक व इतर धार्मिक लोकांनी मॅलथसवर शिव्यांचा वर्षाव उडवून दिला; तर श्रीमंत व इनामदार लोकांनीं मॅलथसच्या मताचा तेव्हांच स्वीकार केला. कारण मॅलथसच्या मताप्रमाणें गरीब लोकांच्या विपत्तीबद्दल आपल्यावर जबाबदारी नाही; ही विपनि गरीब लोकांनीं लक्षासंबंधींच्या आपल्याच अविचारी वर्तनानें आपल्यावर औढून घेतली असें त्यांना समर्थन करता येऊ लागलें. मॅलथसच्या मतें अन्नाच्या प्रमाणांत लोकसंख्या आणण्याकरितां विपत्ती, गुन्हे व दुव्यसनें हीं स्वाभाविक साधनें आहेत व मनुष्याच्या लग्र करण्यानेंहीं त्याच्यावर विपति। ओढवते असें झालें. हीं दोन्हीं विधानें ख्रिश्चन धर्मावर व ईश्वरी व्यवस्थेवर काळिमा आणणारी आहे. व या मुद्यावर मॅलथसवर धर्मपर लोक रागावले.
 परंतु मॅलथसचा हा निबंध लिहिण्यांत दारिद्यावस्थेचे एक कारण