पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/114

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१०२]

विस्तीर्ण शेतींत शेतकरी हा एक प्रकारचा कारखानदार असतो. ती हजारों एकर जमीन-मालकीची अगर भाड्यानें घेऊन-तिची लागवड करतो. ही लागवड करण्यास लागणारें सर्व भांडवल हा शेतकरी-कारखानदार पुरवितो, व शतीस लागणार सर्व श्रम मजुरांना मजुरी देऊन तो मिळवितो. अल्प शेतीमध्यें पांचदहा एकर जमीनच एक शतकरी आपल्या स्वतःच्या व कुटुंबाच्या श्रमानें लागवडीस आणतो. या दोन लागवडींच्या पद्धतींत आधिक किफायतशीर कोणती हें ठरवावयाचें आहे.
 विस्तीर्ण शेतीच्या बाजूनें बहुशः खालील फायदे पुढें आणले जातात. या लागवडीच्या पद्धतीमध्यें शेतकींच्या शक्तिमान् यंत्रांचा उपयोग करतां येतो. वाफेचा नांगर, धान्य कापण्याचें यंत्र, धान्य मळण्याचें यंत्र वगैरे खर्चाच्या यंत्रांचा उपयोग करतां येतो व यंत्रानें मजुरांच्या श्रमापेक्षां पुष्कळ फायदा होतो हें उघड आहे. परंतु या यंत्रांना भरपूर काम मिळेल एवढी मोठी शेतकी एकट्या मालकाची पाहिजे तर ही यंत्रं काटकसरशीर होतात.
 दुसेंर, विस्तीर्ण शेतींत कुंपणें, रस्ते, बांधवंधारे वगैरेसारख्या बाबतींत जमीन कमी फुकट जाते. तींच लहान लहान शेतें असलीं म्हणजे या बाबतींत खर्चही जास्त होतो व पुष्कळ जागा वायां जाते.
 विराटस्वरूपी कारखान्याला सामान्य असे फायदे व काटकसर या विस्तीर्ण शेतींत होतात. देखरेखीचा खर्च कमी होतो. उदाहरणार्थ, मेंढ्यांचा कळप १०० चा असला काय किंवा ४०० चा असला काय त्याला गोपाल एकच लागतो; माल थोडा काय किंवा फार काय परंतु नेण्याआणण्याकरिवां गाडी बमैरेसारखा खर्च सारखाच येतो.
 तिसरें, विस्तीर्ण शेतींत पिकाची योग्य परंपरा लावण्यास सुलभ पडतें म्हणजे पहिल्या वर्षी एका जमिनीच्या तुकड्यांत एक पीक; दुसऱ्या वर्षी दुसरें योग्य पीक; तिसया वर्षी जमीन ओसाड टाकणें, वगेरे गोष्टी जमिनीचा कस व मगदूर कायम राहण्यास कराव्या लागतात व त्या विस्तीर्ण शेतींत करणें सोईचें असतें; परंतु अल्प शेतींत हैं करणें शक्य नसतें.
 विस्तीर्ण शेतीच्या पद्धतीचे हे फायदे निर्विवाद् आहेत. परंतु अल्प शेतीच्या समर्थकांचें म्हणणें असें आहे की,हे फायदे जरी त्या पद्धतीत असले तरी त्यांत एक जबरदस्त दोष आहे. तो हा कीं, शेतकीवर श्रम