पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९७]

सनदा करून देत. या कंपन्या दोन प्रकारच्या असतः एक नियमबद्ध कंपनी व दुसरी संयुक्तभांडवली कंपनी. पहिल्या प्रकारच्या कंपनीला एखाद्या देशाशींं व्यापार करण्याचा सर्व मत्का मिळालेला असे; परंतु यामध्यें कंपनीचा सभासद आपआपल्या भांडवलावर स्वतंत्र व्यापार करी. कंपनीचे असें स्वतंत्र भांडवल नसे. प्रत्येक सभासदाला कांहीं प्रवेश फी द्यावी लागे व कंपनीच्या खर्चाकरितां वार्षिक वर्गणीही यावी लागे व कंपनी जे जे नियम करील ते ते नियम प्रत्येक सभासदाला पाळावे लागत. परंत अशा कंपनीला परदेशामध्यें किल्ले, बंदरें किंवा दुसऱ्या मोठ्या खर्चाचीं स्वसंरक्षणाचीं कामें करणें कठीण पडे. यामुळे अशा कंपन्यांचा तादृश उपयोग होत नसे.
 संयुक्तभांडवली कंपनीचे भागीदार असतात. या भागीदारांच्या भागानें एकत्र झालेलें भांडवल म्हणजे कंपनीचें भांडवल हेोय. या कंपनींत भागीदार स्वतः कंपनीचें काम पहात नाहींत. तर भागीदार लोक आपल्यांतील कांहींजणांना डायरेक्टर म्हणून नेमून देतात व हें डायरेक्टरांचें मंडळ कंपनीचा सर्व व्यापार किंवा धंदा पाहतें. संयुक्तभांडवली कंपनी व खासगी पातीचा धंदा यांमध्यें मुख्य भेद असा आहे कीं, संयुक्तभांडवली कंपनीत भागीदारासं आपलें भांडवल वाटेल तेव्हां कंपनीतून काढून घेतां येत नाही. त्यांला आपला भागदुसऱ्या विकून आपलें भांडवल मोकळे करतां येतें व या विक्रीस दुसऱ्या भागीदारांच्या संमतीची जरूरी नसते. खासगी पातीमध्यें इतरांच्या संमतीशिवाय नवा पातीदार घेतां येत नाहीं.
 इंग्लंडमध्यें परदेशांशीं व्यापार करणाऱ्या कांहीं कंपन्या संयुक्तभांडवली होत्या. जिनें एका शंभर वर्षांमध्यें सर्व हिंदुस्थान देश काबीज केला, ती ईस्ट इंडिया कंपनीही संयुक्तभांडवली कंपनीच होती. परंतु त्या काळीं हें संयुक भांडवलाचें तत्त्व बाल्यावस्येंत होतें व म्हणून अशा कंपन्यांचा व्यापारधंदा चांगला चालत नसे. अँँडाम स्मिथ याचें मत त्याच्या काळच्या अनुभवावरून या तत्वाच्या विरुद्ध झालें होतें.
 अँँडम स्मिथला संयुकभांडवली कंपनीच्या कारभारांत दोन दोष अपरिहार्य वाटत. संयुक्तभांडवली कंपनीच्या मॅनेजरास आपलेपणा वाटणे शक्य नाहीं. यामुळे खासगी धंदेवाला जितकी काळजी घेईल,