पान:ही अंतःकाळाची मिरवणूक अधिक प्रिय - दामोदर हरी चापेकर.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साथीचा जोर

इतक्यात शहरात ग्रंथीक सन्नीपाताचा आजार वाढत चालल्याची वार्ता ऐकू येऊ लागली. सरकार या विषयी चांगला बंदोबस्त करते असे लोक बोलू लागले. तो बंदोबस्त मुंबईसारखाच होणार असेही लोक म्हणत. मुंबईत जो बंदोबस्त होता तो आम्हास बिलकूल पसंत नव्हता. तेव्हा आमचा निर्णय झाला की, जर या ठिकाणी मुंबईसारखा बंदोबस्त सुरु जाहला तर आपण या विरुद्ध ओरड करायची. याप्रमाणे विचार करतो तो हळूहळू ती पद्धती सुरू जाहली.

त्याच्या बंदोबस्तासाठी रॅंडसाहेबाची नेमणूक

आणि थोडयाच दिवसात ऐकण्यात आले की, कोणी रॅंडसाहेब म्हणून आले तो या कामावर नेमला. शोध करता हाच रॅंडसाहेब बहादूर सभ्य गृहस्थास कैदीची शिक्षा देणार. मग आम्ही विचार केला की, कचेरीच्या इतर अधिकायांना त्रास देऊन त्यांना सावध न करता मुख्य इसमास शासन करावे. रॉडसाहेबाची आम्ही तो चांगला आहे की, वाईट आहे याबददल चांगल्या तहेने चौकशी केली. ती सर्व शहरात सर्वतोमुखी तो दुष्ट आहे असे ऐकण्यात येईल. याबद्दल सर्वप्रसिद्ध आहे. तथापि आपल्या शहरांत त्याचा दुर्गुण दृष्टीस पडण्याची आमची फार इच्छा जाहलःरॉडसाहेब नेमला इतके ऐकिल्यापासून आम्ही दोघे भाऊ आणि भिस्कुटे असे तिघे त्याच्या तपासास लागलो. पण तो दृष्टीस पडेना. कोण म्हणे तो अजून आला नाही. कोणी म्हणे आला. अशा अनंत गया शहरांत पसरत. आम्ही लष्कर हदीत दररोज हेलपाटे घालू लागलो, पण त्याच्या बंगल्याचा शोध लागेना. कमेटीवर पुष्कळ वेळा गेलो. त्याठिकाणी हंगकांगचा बेव्हरीन कर्नल फिलिप्स डाकतर वगैरे गोरे दिसत. त्यापैकी कर्नल फिलिप्स हाच आम्ही रॉडसाहेब समजत होतो. पण तो भ्रम एके दिवशी चांगल्या आधारावरून पिटला. हा कसा समजेल या चितेत आम्ही निमग्न होतो. कोणाला प्रसिद्ध रितीने विचारता येईना. कटवार शोधायचा असा किती दिवस आमचा प्रयत्न नुसता रॉडसाहेब दृष्टीस पडण्यास लागला याचे कारण तो त्यावेळेस इथे