पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/६४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२८ हिन्दुधर्मशास्त्र. धनहारी होतात अशी ग्रंथकारांनी स्थिति केली आहे तीवरून पत्नीला घनाधिकार असेल तेव्हां दत्तक घ्यावा हे सिद्ध होतें. आतां कोणते प्रकारांनी घ्यावा त्यांचा विधि 'अपुत्रो मृतपुत्रो वा' इत्यादि क्यनेंकडून पारिजातादिकांत सांगितला आहे. मिता- क्षरेंत होमोत्तर जलपूर्वक पुत्रदान करावें इतका विशेष आहे. दत्तकाशौच असें: सगोत्रादि घेतला तर दशाहाशौच स्पष्टच आहे. असगोत्रासपिंड असेल तर त्याचें दोन्ही मातापित्यांस त्रिरात्रच आहे, दशाह नाहीं. सपिंडास एकाह आहे. जनक- पित्याचे दत्तकास त्रिरात्र आणि पालकपिता मृत झाला तर त्याचें दत्तकाला दशा- " हादिक आहे. जनकास पुत्रपत्न्यादि नसतील तर त्याचीही क्रिया वगैरे दत्तकानेंच करावी. त्यांत दर्शमहालयादि मंत्राने करावी. सांवत्सरिकें भिन्न भिन्न करावी. सं- । ध्यादिकांत गोत्रोच्चार पालकाचाच करावा. विवाहांत दोन्ही गोत्रांचा विचार करावा. . दत्तकग्रहणानंतर औरस उत्पन्न झाला तर धनाचे तीन अंश औरसाचे होतात. दत्तकाचा चतुर्थांश होतो. हा दत्तकदर्पणाचा मराठी भाषेत सारांश लिहिला आहे.