पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९१ ) शेवटीं थोडें लिहावयाचें आहे. ह्या दोन प्रकर- णांतील व पुढील दोन प्रकरणांतील हकीगतीवरून ध्यानांत येईल की, ब्रिटिश राष्ट्राचा सांप्रत जो एवढा मोठा विस्तार झाला आहे, तो होण्यास इंग्लिशांना अनेक युद्धप्रसंग करावे लागले आहेत. आजमितीस देखील जगाच्या शांतते- वर ब्रिटिश राष्ट्रानें होणारे परिणाम.. राष्ट्राएवढ्या अफाट सरहद्दीवर वारंवार लढाया होतात. तथापि ब्रिटिश राज्यसत्तेमुळे हल्लीं ब्रिटिश प्रदेशांतहि युद्धप्रसंगाचें फारसें भय राहिले नाहीं; अशा प्रकारचें उदाहरण जगाच्या इतिहासांत दुसरें एकहि सांपडावयाचें नाहीं, असें म्हणण्यास कांही शंका दिसत नाहीं. हिंदुस्थानांतील २८ कोदि प्रजेपैकी किती- जणांनीं लढाईमध्यें निघालेला बंदुकीचा आवाज ऐकिला असेल बरें? इंग्लंदावर शेवटची स्वारी झाल्यापासून आज पर्यंत किती वर्षे लोटली बरें? कानड्यांत हल्लीं हमेषा लढाया होत आहेत काय? आत्रेलियांतील किंवा न्यूझी लंदमधील युरोपियन लोकांत झालेल्या लढाईचा इतिहास कोठें सांपडेल? अर्थात् असे प्रकार सांप्रत घडत नाहीत, असेच उत्तर द्यावें लागेल. स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इताली, आस्त्रिया व रशिया ह्या राष्ट्रांच्या संबंधानें असेच प्रश्न केले असतां जें उत्तर निघेल, त्याशीं ह्या वरील उत्तराची तुलना करा, म्हणजे खातरी होईल कीं, ब्रिटिश राष्ट्राने गेल्या कांही वर्षांत जी महत्त्वाची कृत्यें केली आहेत, त्यांपकींच