Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७५ ),

- माल एकटया हिंदुस्थानांत खपला असून राहिलेला. माल पृथ्वीवरील बाकीच्या प्रदेशांत खपला, असें म्हणण्यास हरकत नाहीं. कापडाच्या खालोखाल व्यापाराचा मोठा जिन्नस धातु J ६,००,० रुपयांचा आहे. धातूंचा व्यापार ह्यांत शेफील्ड व बकिंगहाम येथील सुया चाकू वगैरे, आणि स्वान्सी येथील तांब्याचे पदार्थ, ह्यांचा समावेश होतो. तिसऱ्या प्रतीचा जिन्नस यंत्र सामान. हीं यंत्रें बहुतक- रून लीड्स्, मांचेस्तर व ग्लास्गो येथून १,७५,००,००० रुपयांची रवाना होतात. चौथ्या प्रतीचा जिन्नस आग- गाडीचें सामान. हें १,५०,००,००० रुपयांचें मुख्यत्वें लीड्स्, मिड्लबरो, शेफील्ड, बर्मिंगहाम, व्यारो व त्रिस्त- ल येथून रवाना होतें. पांचव्या प्रतीचा जिन्नस लोंक- रीचे पदार्थ. हे १,२५,००,००० रुपयांचे यार्कशायर- मधील वेस्ट रायडिंग येथून जातात. सहाव्या प्रतीचा जिन्नस दगडी कोळसा. ह्याचा व्यापार १,००,००,००० रुपयांचा असून तो मुख्यत्वें न्यूक्यासलशीं चालतो.

 हिंदुस्थानासाठी पदार्थ तयार करण्याचे इंग्लिशांचे जे कारखाने आहेत ते किती महत्त्वाचे आहेत, व त्यांचा संबंध किती शहरांशी आहे, हें वरील वर्णनावरून वाच- कांच्या ध्यानांत येईल. इंग्लंदांतील मोठ मोठ्या शह- रांच्या भरभराटीस जी महत्त्वाची कारणें आहेत, त्यांपै-