पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६३)

ती कमिटी घरपट्टी वगैरे ठरविते; व शहराच्या सुधारणे- संबंधी सर्व प्रकारचीं कामें करिते. म्युनिसिपल कमि- ट्यांशिवाय शाळांसंबंधी कमिट्या ( स्कूल बोर्डस् ) व • लोकल बोर्डासारख्या संस्था ( बोर्डस् ऑफ् गार्डियनस् ) • आहेत; व त्यांतील सभासदांची निवडहि तेच करितात. सारांश, प्रत्येक शहरासंबंधी कामकाजांची व्यवस्था अप्रत्यक्ष रीतीनें त्या शहरांतील लोकच करितात, असें म्हणण्यास कांही हरकत नाहीं. म्युनिसिपालिट्यांच्या अधिकारांत नसणारे एखादें कृत्य करणें झाल्यास शहरां- तील कित्येक उद्योगी पुरुष तें हातीं घेतात, व तें तडीस नेण्यासाठी कंपनी तयार करितात.
 आतां हिंदुस्थानांत ह्याच्या अगदी उलट प्रकार आहे. येथें लोक आपण होऊन कोणतेंहि कृत्य करीत नाहीत; सर्व प्रकारची व्यवस्था सरकारासच करावी लागते. म्हणून इंग्लंदांतील शहरांतून जी व्यवस्था म्युनिसिपालि- ट्या करितात, किंवा खेड्यांतून माजिस्ट्रेट व लोकलबोर्डे ' वगैरे करितात, ती सर्व व्यवस्था हिंदुस्थानांत प्रत्येक जिल्ह्यावरील मुख्य अधिकारी जो कलेक्टर त्याला त्याच्या जिल्ह्यापुरती करावी लागते. ह्यामुळे कलेक्टराला फार ' कलेक्टर ' ह्या नात्यानें त्याच्या काम पडतें. जिल्ह्याच्या जमाबंदीची जबाबदारी त्याच्यावर असते. तसेंच माजिस्ट्रेट ह्या नात्यानें त्याच्या जिल्ह्याच्या शांततेची व त्यांतील लोकांच्या कल्याणाची जबाबदारी त्याच्याच