पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५३ )

गेला. तसेच लाई लैव्ह, लार्द वेलस्ली, लाई हेस्टिंग्स् व लाई दलहौसी हे ४ पुरुष वरील काळांत ध्यानांत ठेवण्यासारखे झाले. पहिल्यानें ब्रिटिश सत्ता पूर्व किना- ज्यावर मद्रासपासून कलकत्त्यापर्यंत स्थापिली; दुसरा व तिसरा ह्यांनी मराठ्यांची सत्ता नष्ट करून देशाच्या मध्यभागी व पश्चिम किनाऱ्यावर सत्ता स्थापिली; व चौथ्यानें वायव्येकडील प्रदेशांत सत्ता स्थापून ब्रिटिश सरहद्द सिंधु नदीपर्यंत वाढविली.
 शेवटीं हिंदुस्थानांतील इंग्लिशांच्या इतिहासासंबंधानें ४ काळ विशेष लक्षांत ठेवण्यासारखे आहेत, असे दिसू- न येईल. १ ला काळ लाई लैव्हचा. ह्या काळांत चरील इतिहासा- मुख्यत्वें ३ गोष्टी घडल्या त्याः - (१) फ्रेंच चे मुख्य काळ. लोकांचा पराजय; (२) इंग्लिश शिपाई व नेटिव्ह शिपाई ह्यांच्या एकत्र सैन्याने नेटिव्ह राजाचा केलेला पहिला पराजय; व (३) नेटिव्ह राजाच्या वतीनें बंगाल प्रांताच्या राज्यकारभाराचा कंपनीनें केलेला स्वी- कार. २ रा काळ वारन हेस्तिग्स्चा. कंपनीच्या अंतः- स्थितीची सुधारणा व इंग्लिश कामगारांनी राज्यव्यवस्थे- ची केलेली उत्तम सुधारणा, ह्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या काळांत घडल्या. ३ रा काळ इ. स. १८५८ हा होय. कंपनीचा शेवट आणि इंग्लिश राष्ट्राकडून सर्व राज्यकारभाराचा स्वीकार, ह्या गोष्टी ह्या काळांत घडल्या. ४ था काळ इ. स. १८७७. ह्यांत राणी सरकाराने "हिंदुस्थानची बादशाहीण" असा किताब घेतला.