पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४८ )

ण्याचें कारणच नसे, हैं उघड आहे. संस्थानांत इंग्लिशांचा अंमल पसंत प्रत्येक नेटिव्ह करणाऱ्या नेटिव्ह लोकांचा एक पक्ष असे; आणि ह्या लोकांस स्वदेशाभिमान म्हणुन काय पदार्थ आहे हें माहीतच नव्हतें, म्हणून आपल्या राजास पदच्युत करून तेथे इंग्लिशांचा अंमल सुरू करण्यास आपणाकडून होईल तितकी मदत कर- ण्यास हा पक्ष तयार असे. ह्यामुळे फक्त राजांचीच अदलाबदल होत असे असें नाहीं, तर तेथील पूर्वीची वाईट राज्यव्यवस्था बंद होऊन तेथें चांगली राज्यव्यव- स्थाहि सुरू होई. सारांश, पैशाची चंगळ, शांत डोक्याचे मुत्सद्दी, पराक्रमी सैन्य व मदत करण्यास पाठीशीं दुसरें राष्ट्र, इतक्या गोष्टी अनुकूळ असल्या- मुळे कंपनीस यश येत गेलें, ह्याबद्दल आश्चर्य मानण्यात जागा राहत नाहीं. तिला यश आलें नसतें तर मात्र तिचा कारभार फार अव्यवस्थित होता, असें म्हणण्यास सबळ कारण होतें.
 तथापि कंपनीला यशच आले, व इ. स. १८५६त तिजकडे हिंदुस्थानची सार्वभौम सत्ता आली. तिला ही स्थिति प्राप्त होऊन फार काळ लोटला नाहीं तोंच हिंदुस्थानांतील ह्या देशांतील मोठ्या बंडामुळे तिच्या तेथील मोठे थंड. सत्तेस मुळापर्यंत धक्का बसला. नेटिव्ह शिपायांचा प्रामाणिकपणा, हाच काय तो कंपनीच्या एवढ्या यशाचा आधारस्तंभ होता, असें वर स्पष्ट झा-