पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४६ )

चा विस्तार ) ह्या नांवाचें प्रोफे. सीली ह्यांनी जे पुस्तक केलें आहे, त्यांत त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. प्रथमतः कंपनीचे प्रतिस्पर्धी राजे हे निरनिराळ्या व्यक्ति असल्यामुळें त्यांस आपले सामर्थ्य आपल्यामागून गादी- वर येणारांस देतां येत नसे. ह्यामुळे एखादा बलिष्ठ राजा मरून त्याच्या गादीवर त्याचा निर्बळ मुलगा आला कीं, राज्यांत वखेडा सुरू झाला. बलिष्ठ राजाला बलिष्ठच मुलगा होईल, असा नियम कोठें आहे ? पराक्रमी सेनाधि- पतीला पराक्रमीच मुलगा झाला आहे, अशी उदाहरणे इतिहासांत किती आढळतील ? तसेंच एखाद्या नेटिव्ह राजाच्या पदरीं पराक्रमी सेनापति असला तर त्याला लढाईंत मरण्याची, मारेकऱ्यांच्या हातून ठार होण्याची किंवा तापानें वगैरे मरण्याची भीति आहेच; आणि तो मेला की त्याच्या सैन्यांत अव्यवस्था झालीच. परंतु कंपनीची गोष्ट अशी नव्हती; ती एकच व्यक्ति नसल्या- मुळे तिचा नाश होणे फार कठीण. शिवाय कंपनीला आप- ल्या पदरीं लप्करी कामांत व राज्यव्यवस्थेच्या कामांत प्रवीण लोक ठेवितां येत असत; कारण त्यांस चांगले पगार देण्याचें सामर्थ्य तिच्या आंगीं असे. तसेंच योग्य पगार देऊन कवायत शिकलेले शिपाईहि तिनें आपल्या पदरीं ठेविले होते. सारांश, ( १ ) कंपनी असणें, ( २ ) बुद्धिमान् लप्करी लोक व राज्यकार्यधुरंधर लोक नौकरीस ठेवण्याचें सामर्थ्य आंगीं असणें, आणि ( ३ )