पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२

ल्या स्वाऱ्या केल्या तेवढ्यांबद्दलच तूर्त विचार करावयाचा आहे. हिंदूंची स्वारी इतक्या प्राचीनकाळी झाली कीं, त्या स्वारीच्या संबंधानें ध्यानांत ठेवण्यासारख्या गोष्टींचा लेखी इतिहास उपलब्ध नाहीं; परंतु इतकें मात्र ठाऊक आहे कीं, हिंदु लोक मध्य एशियांतून हिमालयाच्या खिंडीतून ह्या देशांत आले; आणि त्या आर्य लोकांनी येथील मूळच्या रहिवाशांस पहाडांत व जंगलांत हाकून देऊन त्यांचे सुपीक प्रदेश बळकाविले.
अफगाण लोकांची स्वारी.  नंतर ह्या देशांत त्यांनीं आपल्या मजींप्रमाणे सुधारणा सुरू केली. युरोप खंड ज्या काळीं रानटी स्थितींत होतें, त्या काळी हिंदुस्थान देश पुष्कळ रीतीनें हल्ली इतका सुधारलेला होता. तत्वज्ञान, कविता, कला, शिल्पशास्त्र, व उत्तम प्रकारच्या व्यवस्थित मंडळ्या हीं त्या काळी ह्या देशांत होती. परंतु साधारण नियमाप्रमाणेच पुढें ह्या दे- शाची स्थिति झाली. हें सुधारलेलें राष्ट्र निर्वळ झालें; आणि रानटी लोकांच्या टोळ्यांपासून स्वसंक्षरण करण्याचें सामर्थ्य ह्या राष्ट्राच्या आंगीं राहिलें नाहीं. ह्या हिंदु लोकांनीं ज्याप्रमाणें स्वाऱ्या केल्या, त्याप्रमाणें स्वाऱ्या कर- ण्यास ते रानटी लोक टपूनच बसले होते. हे रानटी लोक म्हणजे अफगाण लोक होत. विल्यम दि काकरर ह्यानें ज्या सुमारास इंग्लंदावर स्वारी केली, त्याच ( इ. स. १००० च्या ) सुमारास अफगाण लोकांनी हिंदुस्थाना- वर हल्ला केला. अफगाण लोक मुसलमान होते, वं