पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१६०) जाणार असा अजमास आहे. शिवाय भिक्षकऱ्यांची संख्या हल्ली १५ लक्ष आहे, असेंहि माहीत आहे. तसेंच लंडन शहरांत व ब्रिटिश बेटांतील इतर मोठ मोठ्या शहरांत चांगले सशक्त लोक काम करण्यास तयार असतांहि त्यांना काम- वेदा मिळत नाहीं, असेंहि आपण नेहमीं वाचितों. तेव्हां ह्या एकंदर स्थितीचा विचार केला असतां, ह्या फाजील लोकसमूहाची सोय लावणे हा प्रस्तुत काळी इंग्लिशांपुढे एक फारच महत्त्वाचा प्रश्न आहे, असे म्हणावे लागते. वाढत चाललेल्या लोकसमूहाला राहण्यासाठी वसाहतींची आवश्यकता आहे, असे प्राचीन काळच्या लोकांस वाटत असे; इतकेच नव्हे, तर १०० वर्षांमागे लोकांची अशीच समजूत होती, ह्यांत संशय नाहीं. अगदी परकीय देशांत जाऊन राहणें लोकांच्या फार जिवावर येत असे; कारण तेथें कायदे नवे, धर्म नवा व कदाचित् भाषाहि नवीनच; सारांश तेथें सर्व कांहीं नवें. ह्यामुळे त्या दूरच्या देशांत जाऊन राहणाऱ्या मनुष्याला आपण अगदी परक्या ठिकाणी येऊन पडलों आहों, असें मरे- पर्यंत वाटावयाचें. युनाय्तेद स्तेत्स हे ह्या संबंधानें अप- वादक आहे; कारण इंग्लंदांतील भाषा तीच तेथील भाषा आहे; व इंग्लंडच्या राज्यव्यवस्थेच्या नमुन्यावरच थोडी बहुत तेथील राज्यव्यवस्थाहि आहे. म्हणून त्या राष्ट्रांत जाऊन राहणें त्या लोकांस हल्लीं परक्याप्रमाणे वाटत नाहीं. ह्यास्तव इंग्लंदांतून बाहेर राहण्यास जाणाऱ्या लोकांना त्रिटिश वसाहतींशीं टक्कर मारण्यास युनायूतेद स्तेत्स हल्ली तयार आहे.