पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५५) ( ह्यावरून युनाय्वेद स्तेत्समध्ये साधारणपणे दर माणशी १० शिलिंगांपेक्षां किंचित् कमी माल खपतो, व आस्त्रेलियामध्ये ८ पौंडांचा खपतो, असे झालें. तेव्हां युनाय्तेद स्तेत्स मधल्या ३३ गिन्हाइकांबरोबर आस्बेोले- यांतील २ गि-हाइकें झाली. ) ह्या भांकड्यांमध्ये २ कारणांनी फेरफार होण्या- चा संभव आहे. (१) इतर राष्ट्रांनी अन्य देशांतील माल आपल्या देशांत येऊं न देण्याचे उपाय वाढविणें [ आपल्या व्यापाराचें संगोपन करणें ] आणि ( २ ) लोकांच्या मनोवृत्तीत बदल होणे, म्हणने त्यांच्या आवडींत किंवा रितीभातींत बदल होणें. उदाहरणार्थ, केव्हां केव्हां जिनीवा येथील घड्याळांपेक्षां इंग्लिश घड्याळें लोकांना अधिक आवडतात; परंतु पुन्हा कांही काळाने इंग्लिश वड्याळांपेक्षां अमेरिकन वड्याळे अधिक आवडूं लागतात. ह्यांतील १ ल्या कारणासंबं- धानें विचार केला असता असे दिसून येईल की, हल्लीं युरोप किंवा अमेरिक खंडांतील राष्ट्रे आपापल्या व्यापा- राचें जितकें संगोपन करीत आहेत, त्यापेक्षां कांहीं कार- जानें पुढें कमी संगोपन करूं लागतील, असा कांहीं फारसा संभव आज दिसत नाहीं. आपल्या देशांतील यंत्रांचाच खप व्हावा म्हणून इंग्लंदाहून येणाऱ्या यंत्रां- वर अमेरिकेतील संस्थानांनीं कर बसविला आहे; व इतर राष्ट्रांनी आपापल्या व्यापाराचे संगोपन केले असतां त्यापासून ब्रिटिश राष्ट्रावर हो- णारे परिणाम.