पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३७) पुरवठा करून घेण्यासाठी, अशा प्रकारची कित्येक ठिकाणे त्यांना ताब्यांत ठेवणें अवश्य आहे. अशीं ठिकाणें नसतील तर त्यांच्या गलबतांस सतत पुष्कळ मैल लांब जाणे भाग पडेल, व तसे होणें वरील अडचणी- मुळे चांगले नाहीं. सेंट हेलेना व मारिशस हीं बेटें ब्रिटिश वसाहतींना मूळ देश जो इंग्लंद त्याशी जोडणाऱ्या कड्याच आहेत. ह्यांतील पहिले आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर असून केप ऑफ गुड होप जेव्हां डच लोकांच्या ताब्यांत होतें, तेव्हां ते इंग्लिशींच्या फार उपयोगी पडत असे. मारिशस हैं बेट आफ्रिकेच्या पूर्वेस हिंदी महासागरांत आहे. तसेच हिंदुस्थानच्या रस्त्यावर भूमध्य समुद्रांत शिरतांनाच लागणारें जिब्राल्टर, त्याच्यापुढे माल्टा, सैप्रस, तांबडया समुद्राच्या मुखाशी असलेले एदन, आणि सोकोत्रा व सिकेलीस बेटें, हीं ठिकाणें त्यांच्या ताव्यांत आहेत. हिंदुस्थानच्याहि पुढे पासिफिक महासागराच्या रस्त्यावर सिंगापूर त्यांच्या ताब्यांत आहे; आणि भूगो- लाच्या दुसऱ्या आंगास दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेस केप हार्न जवळ फाकूलंद बेटे व त्या महासागरांतील इतर निरनिराळी कमी महत्त्वाची ठिकाणें त्यांच्या ताब्यांत आहेत. ह्यावरून असे दिसून येईल कीं, १ल्या व २व्या वर्गांतील वसाहतींचा इंग्लिशांस प्रत्यक्ष फार उपयोग होत असल्यामुळे त्या विशेष महत्त्वाच्या आहेत;