पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२४ ) इंग्लिश वसाहतीतील लोकांस अर्थातच त्यामुळे राग आला; व युरोपांत इंग्लिश व फ्रेंच ह्यांचे सख्य असले तरी देखील वसाहतींतील त्या त्या लोकांत नेहमीं लढाया होऊं लागल्या. ह्यामुळे प्रशियाच्या राजाचा पक्ष धरून त्याला फ्रेंचांबरोबर लढण्यास इंग्लिशांनी द्रव्यद्वारे मदत केली. त्यापासन आपणांस कोणता फायदा होईल अशी आशा त्यांना उत्पन्न झाली असेल बरें ? ह्याप्रमाणे फ्रेंचांचे सर्व लक्ष युरोपांतील लढाईंतच गुंतविले असतां त्या लांबच्या वसाहतींतील लोकांस मदत पाठविण्याची गोष्ट त्यांच्या हातून होणार नाहीं; व ह्यामुळे सदहू मुदतीत वसाहतीतील फ्रेंचांचे नुकसा करून आपला नफा करून घेण्याची संधी आपल्या वसाहतींतील लोकांस आयतीच मिळेल, अशी आशा इंग्लिशांना उत्पन्न झाली. हा परिणाम इंग्लिशांनी प्रशियाच्या राजाचा पक्ष स्वीकारिल्यामुळेच झाला हे उघड आहे. कांहीं काळानें स्पेन देश नह कान्सच्या तर्फेनं ह्या युद्धांत आंग वातलें, व ह्यामुळे स्पेच्या वसाहतींवरहि हल्ला करण्याची संधी इंग्लिशांस मिळाली. १७६३ त झालेल्या तहामुळे हे युद्ध संपले. तिसरा जार्ज व त्याच्या पक्षाची मंडळी ह्यांनीं हा तह केला; व ह्यांतील कलमें आपणांस जितकी अनुकूळ अस- णें अवश्य होते तितकी अनुकूल नाहीत, असा मागील वेळेप्रमाण ह्या वेळींहि लोकांनी गिल्ला केला. युद्ध सुरू असतां इंग्लिशांनी फ्रेंचांच्या ताब्यांतील बहुतेक वेस्त इंदीज बेटे घेतली होतीं; व वरील तहामुळे ही त्यांची त्यांस परत 1