समुद्राच्या आसपास असलेल्या ह्या चार देशांपैकीं रोमचे
लष्कर सर्वांत जास्त होतें, व व्यापार कमी होता; म्हणून
कांहीं काळानें रोमन लोकांनी टायर, ग्रीस व कार्थेज हे
देश जिंकून घेतले, व भूमध्य समुद्राचा सर्व किनारा
तसेंच ब्रिटन देश ह्या आपल्या ताब्यांत आणिला.
काळापर्यंत सुधारणेच्या टप्प्याच्या बाहेर होता, तो त्यां-
नीं जिंकून ब्रिटिश लोकांना सुधारणेच्या मर्यादेच्या आंत
आणून सोडिलें, हा त्यांजवर रोमन लोकांनी मोठा उप-
कार केला.
कित्येक शतकें भूमध्य समुद्र में सुधारणेचे माहेर घर होतें.
जरी रोमन राष्ट्रावर एका बाजूने गाथ
( फ्रान्स ) व जर्मनी ह्यांनीं व दुसऱ्या बाजूनें मुसलमान
लोकांनी स्वाच्या केल्या, तरी युरोपांतील राष्ट्र भूमध्य
समुद्रालाच धरून होतीं.
त्यांचा बहुतेक व्यापार
भूमध्य समुद्रांतून व युरोप खंडाच्या उत्तरेकडील देशां-
मधील लहान लहान समुद्रांतून चालत असे. ह्याशिवाय
जो थोड़ा बहुत व्यापार राहिला, तो फक्त हिंदुस्थानाशीं
चालत असे, व तो कारवानांच्या द्वारें चालत असे.
हे कारवान हिंदुस्थानांतील जिन्नस भूमध्य समु
द्राच्या किनाऱ्यापर्यंत आणून टाकीत; व नंतर
त्या जिनसांचा खप ज्या देशांत होत असे, त्या देशांत
ते जलमार्गानें पाठविण्यांत येत. खुद्द हिंदुस्थानाविषयीं
त्या लोकांस थोडीच माहिती असे, चीन देशाची त्या
९