पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८७)

वास्तविक भरभराटीसाठी त्यांनीं आजपर्यंत जी खटपट केली आहे, ती सर्व फुकट जाईल. अशा अंदाधुंदीच्या स्थितींत व्यापारामध्ये त्यांनी घातलेली भांडवले फुकट जातील; आणि एवढ्या मोठ्या श्रमानें बांधिलेली त्यांची हिंदुस्थानची व्यापारसंबंधाच्या भरभराटीची इमारत ढास- कून जाऊन स्वप्नवत् होईल.

 अशा दुष्परिणामामुळे इंग्लंदावर जेभयंकर प्रसंग गुदरतील, त्याचें चित्र ह्याहून स्पष्ट वठविण्याची आव श्यकता दिसत नाहीं. कित्येक वाईट प्रसंगांचा थोडा बहुत अनुभव इंग्लिशांना आहेच. परंतु हिंदुस्थानासंबंधानें वरील प्रकारचा प्रसंग आल्यास ह्यापासून जे भयंकर परि णाम त्यांच्यावर घडणार आहेत, त्यांच्या पासंगासहि ते मागील परिणाम लागणार नाहींत. लांकाशायरच्या व्यापाराचा समूळ नाश होईल; व यार्कशायरच्या व्या- पाराला भयंकर धक्का बसेल. हिंदुस्थानापासून त्यांना हल्लीं अतोनात फायदा होत आहे, व त्यांच्या मुलां- नातवांसहि ह्या देशापासून पुढे मोठा द्रव्यलाभ व्हावयाचा आहे; ह्या गोष्टींचा त्यांनी विचार केला असतां ह्या देशाच्या भावी परिणामाविषयीं उदासीन राहण्यास त्यां- च्यापैकी कोणी क्षणभर देखील तयार होणार नाहीं; व हा देश ताब्यांत राखण्यास ज्या ज्या गोष्टी करणे पडेल, त्या त्या करण्याविषयीं कधींहि पाऊल मागें घेणार नाहीं. कारण अशा प्रकारची हयगय केली असतां