पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५६)

ह्यामुळे तेथील शेतकऱ्यांना तेथील यंत्रे अवाच्या सवा किमती देऊन विकत घ्यावी लागत आहेत; म्हणून ते शेतकरी कदाचित् त्या संस्थानांविरुद्ध उठण्याचा संभव आहे. परंतु अशा प्रकारचा फेरफार होईल, असेहि आपणांस धरून चालून उपयोग नाहीं.

 तसेंच व्यापारासंबंधी हे प्रतिबंध एखाद्या राष्ट्रांत जस जसे अधिक काळ सुरू असतात, तस तसे ते मोडू- न देण्याचेंहि अधिकाधिक जिवावर येतें. कारण ह्या प्रतिबंधांमुळे जे फायदे होण्यासारखे दिसतात ते जस जसा अधिक काळ लोटेल, तस तसे पहिल्यापेक्षा अधिक मह- त्त्वाचे वाटू लागतात. आतां एखाद्या राष्ट्रांत जर आरंभीच अप्रतिबंध व्यापार [ फ्री ट्रेड ] सुरू असला, व पुढें कांहीं काळपर्यंत तो तसाच चालू राहिला, तर त्या राष्ट्राच्या हातून तेथील व्यापाराचें संगोपन [प्रोटेक्शन] होण्याचाहि संभव कमी आहे; कारण अप्रतिबंध व्यापारापासून फायदे आहेत असे ज्यांना वाटत असतें, त्यांना ते फायदेहि, वरच्याप्रमाणेंच जस जसा अधिक काळ लोटत जातो, तस तसे अधिक ढळढळीत दिसूं लागतात. अशी वास्तविक स्थिति असल्यामुळेच काब्डन ह्याला त्याच्या वेळवे धान्यासंबंधी कायदे * [कॉर्न-लॉज् ]


 * इंग्लंदांतील लोकांची काब्डन ह्याच्या वेळेपर्यंत अशी सम- जूत होती कीं, परराष्ट्रांतून पाहिजे तितकें धान्य आपल्या देशांत