पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०६)

होता, व गुलामांच्या व्यापारास तेथें प्रत्यवाय नव्हता; मेरिलंद ही वसाहत रोमन क्याथलिक पंथाची असून


ऑफ् इंग्लंड ) हे पद धारण केलें. त्याप्रमाणे ज्या धर्मपंथाला राजाश्रय आहे त्याला ' चर्च ऑफ इंग्लंड म्हणतात. सहावा एडवर्ड हा प्राटेस्टंट धर्मपंथानुयायी असून ज्ञानमर, रिडले व लाटि- मर त्यांच्या साह्यानें त्यानें इंग्लंदांतील धर्माच्या सुधारणेसाठी पुष्कळ खटपट केली. सहावा एडवर्ड ह्यानें धर्मसंबंधी केलेले कायदे आलु ठेवण्याविषयीं मेरी राणीनें वचन दिले होते. परंतु ती नि:-) सीम क्याथलिक मताची पडल्यामुळे गाडीवर बसल्याबरोबर धर्म- सुधारणेचा विध्वंस करण्याची सुरवात तिने केली क्रामनर, रिडले व लाटिमर त्यांस तिनें तुरुंगांत टाकिलें; व लवकरच ह्या तिघांस व दुसऱ्याहि पुष्कळांस धर्माच्या पायीं अनिमुखी पडावें लागलें. हिच्या कारकीर्दीतील शेवटच्या तीन वर्षात पुरुष, स्त्रिया व मुले मिळून सुमारे २८० माणसांस पाखंड मताची म्हणून जाळून टाक- ण्यांत आलें. नंतर १५५९त प्रोटेस्टंट मताची पुन्हा स्थापना होऊन इंग्लंदच्या धर्मपंथास सांप्रतचें स्वरूप आलें. १५६२त कानमर त्यानें लिहिलेल्या धर्मश्रद्धेच्या ३९ कलमांचा प्रार्थनेच्या पुस्तकांत समावेश करण्यांत आला. एलिझाबेथ राणीनें असें निक्षून सांगितलें कीं, सदई ३९ कलमांत निर्दिष्ट केल्याप्रमाणे जे इंग्लंडचें एपिस्कोपल चर्च' [ कायद्याने स्थापन झालेला इंग्लंदां- तलि धर्मपंथ तो हाच, व ह्याजवर सर्व प्रकारची देखरेख विशप लोकांची] त्यांतील मतांपासून काडीभरहि अलीकडे पलीकडे पाऊल पडल्यास आपणांस सहन व्हावयाचें नाही. असे असतांहि इंग्लं- दांत १६४९त ‘ प्रेस्बिटेरियन’ म्हणून एक धर्मपंथ धर्मसंबंनी बंडाचा इंग्लंदांत आतां अगदी बीमोड झाला आहे. चालू झाला.राजाश्रित धर्मपंथांचे सर्व हक्क इतर सर्व धर्मपंथाच्या लोकांसाह देण्यांत आले आहेत.