पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०४)


अमेरिकेतील वसाहती,होत्या. उष्ण कटिबंधांत होणाऱ्या उसासारख्या पदार्थांची लागवड करून स्वदेशास त्या पदार्थांचा पुरवठा करणे हा त्यांचा दुसरा उद्देश होता; व अशा प्रकारच्या वसाहती २च्या प्रकारच्या होत. वसाहत करणारांनी ह्या झाडांची पुष्कळ लागवड केली. ह्या कामीं त्यांनीं प्रथमतः त्या देशांतील नेटिव्हांस मजुरीनें लाविलें; आणि जेव्हां तें काम त्यांच्या हातून होत नाहीं असे आढळून आलें, तेव्हां आफ्रिका खंडांतून काम करण्यासाठी त्यांनी शिद्दी लोकांस मुद्दाम नेलें. ह्या दुसऱ्या प्रकारच्या वसाहती म्हटल्या म्हणजे वेस्ट इंदीज बेटें ह्या होत. स्पेन व पोर्तुगाल ह्या देशांच्या वसाहतींचा समावेश ह्या २च्या वर्गात होत असे. ३न्या एका प्रकारच्या वसाहती करण्यासारख्या होत्या, हे उघड आहे. त्या वसाहती अशा कीं, स्वदेशांतल्याप्रमाणेच आंग मेह- नतीनें तेथें शेतकीचा धंदा करावयाचा. स्पेन व पोर्तु- गाल ह्यांच्या अशा प्रकारच्या वसाहती नव्हत्या; परंतु इंग्लंदाच्या बहुतेक वसाहती ह्या ३च्या वर्गात मोडतात.

 १७ व्या शतकाच्या आरंभापर्यंत इंग्रज लोकांनीं अमेरिका खंडांत कोठेंहि स्थाइक वस्ती केली नव्हती. परंतु लवकरच उत्तर अमेरिकेच्या पूर्वेस बऱ्याच अंतरा- वर अत्लांतिक महासागरांतील बर्म्युदा नांवाची बेटें त्यांनी हस्तगत करून घेतलीं; व हात्र इंग्लंडच्या