पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकारी रिपोर्टावरून पाहतां पांच एकर लागवड जमिनीस फक्त दोन नांगरांची ढोरें असें प्रमाण आहे. हे संध्यांच्या स्थितीत अगदों अपुरे आहे. यावरून देशांतील शेतकीस अवश्य लागणारी जी गुरे ती पुष्ट होण्याकरितां सरकारांनी आपले जंगल रखवालीचे नियम जास्त सवलतीचे करणे, लोकांस अधिक गायराने मोकळी ठेवणे व पडजमिनी गरें चारण्याला थोडक्या पैशांत देणे किती अवश्य आहे हे वाचकांच्या लक्ष्यांत येईल. या संबंधांत सरकारास आणखी एक सूचना अशी आहे की, सध्यां प्रदर्शने करून उत्तम जनावरे तयार करणारांस बक्षिसे देणे वगैरे जे उपाय त्यांनी चालू केले आहेत, त्यांचे प्रमाण वाढवून दर तालुक्याचे ठिकाणी एक 'बलिवालय व दर जिल्ह्यास निदान दोन सालांनी एकादें पशूचे व शेतकीचे प्रदर्शन केले पाहिजे. आमच्या मधील मृताच्या बाराव्या दिवशी वृषोत्सर्ग करण्याची वहिवाट आतां बहुतेक मोडतच आली आहे. अशा रीतीने सोडलेल्या पोळांस कधी दावें लागत नसे. आणि त्याने कोणाची कितीही नासाडी केली, तरी त्यास कोणी कोंडवाड्यांत नेत नसे. त्याला नांगराला धरावयाचा नाही किंवा गाडीस जुंपावयाचा नाहीं ! असे असल्यामुळे हे पोळ गुरांच्या सदृढ संततीस उपयोगी पडत. आमचे नंदकरी व आमचा बेंदराचा सण किंवा वसुबारस यांचा. वरील गुरांच्या सदृढ संततीस उत्पन्न करण्याच्या कामी व सध्यांच्या प्रदर्शनांच्या ऐवजी पूर्वी बराच उपयोग होत