Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व आध्यात्मिक बाबतींत किती स्वातंत्र्य उपभोगतो हैं दर्शविण्यासाठी हिंदूंच्या सामाजिक, धार्मिक, नी सांस्कृतिक इतिहासावरील तज्ञ समजल्या जाणान्या विद्वानांची मतें उद्धृत केली आहेत. असे स्वातंत्र्य जो समाज उपभोगतो ते समाज राष्ट आहे असे म्हटल्यास त्यांत धर्मनिष्ठेचा वास येण्यासारखे काय आहे ? तसेच बहुसंख्य असणे यांतही जातीयता काय आहे ? आपणही हिंदूच आहोत असे मानण्यास नी म्हणण्यास कोणालाच बंदी नव्हती. तसे मानणे ज्या त्या जातीच्या इच्छेवर अवलंबून होते. मुसलमान किंवा इतर अल्पसंख्य लोक हे केवळ परधर्मीय आहेत एवढ्यामुळेच हिंदूना त्यांचे विषयों परकीय भाव वाटत नाही, तर ते परकीय संस्कृतीचे आग्रही बनतात, या कारणामुळे वाटतो. मार्क्सवादाचे पुरस्कर्ते आणि हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. राहुल सांकृत्यायन हेही भारतातील मुसलमानांच्या दृष्टिकोनाविषयी म्हणतात, ‘‘भारतीयतेच्या बाबतीत येथील मुसलमानांचा सदैव द्वेष दिसून आलेला आहे, पण स्वतंत्र भारतांत आतां हे चालणार नाही. भारतीय संस्कृतीशी एकरूप झाल्यावांचून कोणताही धर्म विकसित होऊ शकणार नाहीं. खिश्चन, पारशी, बौद्ध आदि धर्मीयांचा भारतीयतेला विरोध नाही. तर मग इस्लामी संस्कृतीचाच कां असावा ? हिंदुस्थानची चालरीत, साहित्य, इतिहास, वेशभूषा इत्यादि सर्व बाबतींत मुसलमानांनी भारतीय संस्कृतीशी एकरूप झाले पाहिजे." मुसलमानी वृत्तीविषयींचे हे मतप्रदर्शन राहुल सांकृत्यायनांसारख्या एका जाड्या विद्वान, तसेच कम्युनिस्ट मताच्या माणसाकडून केले गेले आहे. परंतु सांकृत्यायनांचे नांव वगळून तें मत नुसतेच वाचले तर, ते कोणातरी कट्टर हिंदुत्वानिष्ठाचे असावे असा सामान्यतः समज होईल, इतक्या प्रमाणांत त्यास हिंदुत्वनिष्ठेचा दर्प येत आहे. परंतु गेल्या हजार वर्षांच्या हिंदुस्थानच्या इतिहासाच्या निःपक्षपाती १ केसरी : दि. ६ जानेवारी १९४८ ।।