Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व (State ) यांतील भेदाचे आकलन न झाल्यामुळे, हिंदु-राष्ट्रासंबंधीचा अपसमज निर्माण झाला आहे. एका शासनसंस्थेच्या आधिपत्याखाली जसे एक राष्ट्र असू शकते, तसेच एकाहून अधिक राष्टें अथवा अल्पसंख्याक जमाती असण्यास राज्यशास्त्राचा विरोध नाही. ह्यासंबंधीचे विशेष स्पष्टीकरण उपसंहारांत येईल. विपक्षीयांचा दुसरा आक्षेप असा :-हिंदु राष्ट्राची कल्पना धर्माधिष्ठित आहे. उत्तर :- हिंदूंच्या सामाजिक नी धार्मिक इतिहासाचे परिशीलन केले असतां असा आक्षेप घेण्याला वाव राहाणार नाही. हिंदुस्थानांतील प्रत्येक जण हिंदु असे मानून, आम्हीं सर्व हिंदु आहोत असे अल्पसंख्यांकही म्हणू शकले असते. परंतु त्यांनी तसे केले नाही, हा कांहीं हिंदुसमाजाचा दोष नव्हे. डॉ. केतकर' म्हणतात, ‘ ख्रिस्ती व मुसलमान हे आपणांस हिंदु म्हणवीत नाहींत. हिंदु ह्या नांवावर अधिकार स्थापित करणें हें ज्या त्या जातीच्या किवा सांप्रदायाच्या इच्छेवर अवलंबून आहे." अहिंदनीं जर आपणां स्वतःला • हिंदू' म्हणून संबोधावयाचे ठरविले असते, तर त्यांच्या धार्मिक वा पारलौकिक सद्गतीच्या आड तें आलें असते, असे वाटत नाही. कारण, केतकर' म्हणतात त्याप्रमाणे ६ मतमूलक भिन्नता किंवा उपास्यमूलक भिन्नता या गोष्टी हिंदूंच्या दृष्टीने फारच कमी महत्त्वाच्या आहेत.’ गो. म. जोशी' म्हणतात की, हिंदूने जातीय आचार आणि नैतिक मूल्यें बरोबर पाळल्यास आध्यात्मिक बाबतींत तो शंकर, रामानुज, मध्व, १ ज्ञानकोश, खंड १ ‘हिंदुस्थान आणि जग' पृ. ९९ २ ज्ञानकोश खंड १ हिंदुस्थान आणि जग पृ. ९६ ३ गो. म. जोशी : हिंदूचे समाजरचनाशास्त्र. पृ. ३०६ ।। ३