७३ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व आम्ही अशांस इतकेच सांगणार की, बाबांन! ज्यांच्यांत पाणिनि, वाल्मीकि, कालिदास, आर्यभट्ट, भास्कराचार्य, गदाधरभट्ट वगैरे असंख्यात धेड़ें निपजली, त्या लोकांची केवळ मूर्खातच गणना करणे कठीण आहे. ज्यांच्यांत रामपांडवादिक नाहीं धरले तरी विक्रमादित्य, इतिहासप्रसिद्ध पोरस, शिवाजी, बाजीराव, यशवंतराव, रणजितसिंग विजेच्या गतीने सैन्यासहवर्तमान धांवणारा परवांचा शूर, असे तरवारबहाद्दर होऊन गेले ते केवळ 'मेंढ्याच असतीलसे नाही; तसेच ज्यांच्यांत तुकाराम, रामदास, किंवा रामशास्त्री, माधवराव असे निष्पाप महात्मे; व रमाबाई, अहल्याबाई, अशी भूतलास भूषित व पवित्र करणारी स्त्रीरत्ने निर्माण झाली त्याच लोकांस अघोर, पातकी, दुराचारी, निर्दय म्हणणे म्हणजे शुद्ध दांडगाई आहे. आणि जो धर्म सर्वांत प्राचीन असून शंकराचार्यांसारख्यांनी ज्याच्या रक्षणार्थ आपली बुद्धि खर्चली तो मेकॉले, रेवरेंड विल्सन किंवा जोतीबांसारखे त्यांचे कल्याण, अशांच्या बडबडीनें व शुष्क तकनी व्हास पावेल हैं मुळींच संभवत नाहीं! वरील गोष्टी इतक्या धडधडीत स्पष्ट दिसत असतांही आमच्या लोकांस त्या अलीकडे दिसेनाशा झाल्या आहेत. हे तर काय, पण आपणांस अधिकाधिक कुत्सित म्हणवून घेण्यांतच पुष्कळांस काही विलक्षण प्रतिष्ठा वाटते. ‘हिंदु' हा शब्द ‘मूर्ख' शब्दाशी केवळ समानार्थकच होय असे ते समजतात. आणि त्यांतून जितके सुटून जातां येईल तितके जाण्याचा बहुतेकांचा प्रयत्न दृष्टीस पडतो. हा हिंदुत्वाचा' द्वेष कित्येकांच्या ठायीं इतका जागृत असतो की, पोषाक, रितरिवाज, आचार वगैरे गोष्टींत सर्व प्रकारे इंग्रजांचा नमुना उचलला असल्यामुळे त्यांच्या पूर्वस्थितीची एकमात्र काय ती मोठी खूण त्यांच्यांत राहिली असते---ती अर्थातच काळा रंग होय.’’ ह्या एकाच उतान्यांत चिपळूणकरांनी हिंदुत्ववादाच्या सर्व अंगांचा विचार आपल्या अनन्यसामान्य शैलीने केला आहे. लोकमान्य टिळकांनी १९०६ मध्ये भारत-धर्म-महामंडळांत दिलेल्या
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/81
Appearance