Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[३] मला ठाऊक नाही. म्हणूनच, पूर्वग्रहाचा कोणास वास आलाच तर त्यास माझा निरुपाय आहे. ह्या प्रबंधांत पुरावा म्हणून दिलेले सर्व उतारे त्या त्या विषयावरील अधिकारी लेखकांच्या ग्रंथांतून घेतलेले आहेत, ह्या प्रबंधांत ग्रथित झालेली माहिती वाचकांनीं, थोडी थोडी अशी, कुठेना कुठे तरी वाचलीहि असेल. परंतु तीच संकलित करून संगतवार मांडली असतां काय नि केवढा प्रकाश पडतो ते ह्या प्रबंधावरून दिसेल. हेच ह्याचे वैशिष्ट्य ! संकलित माहितीची संगतवार मांडणी सोडल्यास प्रबंधांत नवीन असें कांहीं नाहीं. सामान्य वाचकांस इतकी सर्व माहिती गोळा करणे इतर दैनंदिन कार्यव्यग्रतेमुळे शक्य नसते, ते तेवढे मी केले इतकाच विशेष ! लेखक