हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व विलें. “ इंग्रजांनी स्वराज्यांत प्रसार करून दौलत आकर्षण केली. त्यास हिंदुधर्म रक्षावा. स्वराज्य राखावें हैं चित्तांत धरून दौलतराव शिंदे यांसुद्धां आम्हीं मसलतीस प्रवतक जाहलों असो. तुम्हांस तो स्वराज्याचे कल्याण पहाणे, व या मसलतीस अनुकूल होणे जरूर आहे......गायकवाडांच्या संस्थानाची व जनानखान्याची सुद्धा दरमहा नेमणूक होऊन इंग्रजांनी बंदोबस्त केला. कुल हिंदूचे दौलतीवर इंग्रजांचा ताबा झाला." |......याच संबंधांत यशवंतराव होळकराचे प्रतिनिधीस लिहिलेले खालील उद्गार ध्यानांत ठेवण्याजोगे आहेत. “ आजपर्यंत हिंदुराज्य सर्वांनी एकदिल राहून चालविले. अलीकडे ज्याचे त्याचे दौलतींत गृहकलह होऊन राज्य विपर्यास पडोन हिंदुधर्म नाहीसा होण्यास मूळ जाहलें. त्याचे छेदन करण्यास सर्व एकदिल झाले पाहिजेत, तर हिंदूची कायमी राहील, आम्हीं जो क्रम इंग्रजांशी लढण्याचा आराभला आहे, हाच यावद्देह चालवावा असे मनांत आहे. यांत परमेश्वर अनुकूल होऊन जें घडविल ते खरे. परंतु एकानेंच असा प्रकार करून बाकीच्यांनी तमाशा पाहून आपापली दौलत सांभाळून असावे, यांतील परिणाम कसा आहे हैं चित्तीं विचारून ज्यांत हिंदु धर्माची कायम व परिणामास नीट ते करावे. याचा विचार तुमच्यासारख्यांनी न केला तर दुसरा कोण करील ?’’ दिनांक २१-१०-१८०४ ला यशवंतरावाने आपला नागपूरचा वकील खंडो महादेव यास कळविले, ‘‘.......येथील एक संधान राहून शत्रूचे पारिपत्य होऊन बंदोबस्त झाला पाहिजे. या अन्वयें तुम्हाही बोलून ज्यांत त्यांची कायमी पूर्वीप्रमाणे राहून, मसलत शेवटास जाऊन, स्वराज्याचा बंदोबस्त घडून, हिंदुधर्म राहील तें करणे. ६ . यशवंतरावानेही या वेळी असा पुकारा केला की, ‘‘ इंग्रजांविरुद्ध सर्व १, २, ३, सरदेसाईं : म. रि. उत्तरिवभाग ३, पृ. २९१-९२, २९७, ३३४
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/77
Appearance