हिंदु राष्ट्रवाद ५९ आजपर्यंत मी जें कांहीं केले आहे ते हिंदुधर्म व हिंदुलोक यांचे रक्षण करण्यासाठींच केवळ आहे. प्रत्यक्ष भवानीने मला अशी आज्ञा केली आहे की...हिंदूची देवालये व हिंदूचे देव यांची नासधूस करणारांचे पारिपत्य कर. हिंदुधर्मद्वेष्टयांचा संहार कर, आपला धर्म बुडत चालला. देव ब्राह्मणास पीडा होत आहे. सर्व भरत खंड म्लेंच्छमय होण्याचा समय आला आहे. असे विचार सांगून शिवाजीने कृष्णाजीस स्वपक्षास मिळविले. अशाप्रकारे शिवाजी अनेक राजकारणी डाव खेळून आणि स्वपराक्रमाने राज्यवृद्धि करीत असतां शहाजी शिवाजीस भेटावयास आला. एकंदर विचारपूस झाल्यावर शहाजी शिवाजीस म्हणाला तुम्ही हिंदु प्रजेस यवनांच्या क्लेशप्रद सत्तेतुन सोडवून स्वराज्यस्थापन व स्वधर्मरक्षण करण्यासाठीं भगीरथ प्रयत्न करून त्यांत यशस्वी झालांत हैं पाहून मला पराकाष्ठेचे समाधान व धन्यता वाटत आहे. आमच्या वडिलांस असा दृष्टांत झाला होता की, तुमच्या कुळांत शककर्ता उत्पन्न होऊन तो हिंदुप्रजेचे व हिंदु धर्माचे ववनापासून रक्षण करील. । शिवाजीच्या संगोपनाखाली, हिंदवीस्वराज्याचें बी, मूळ धरून, वाढू लागले होते. अशा वेळीं साहजिकच जेथे जेथे मुसलमानांची हिंदूवर बळजबरी होई तेथील लोक शिवाजीकडे हिंदूचा . दास्य-मोचक म्हणून साह्याची याचना करीत. सावनूरमधील हिंदू लोक शिवाजीस लिहितात२‘हा युसफ फार खस्त आहे. आम्हीं त्याचे हाताखाली वागण्यास कंटाळलो. तुम्हीं हिंदुधर्माचे संस्थापक, म्लेंच्छांचे नाशक, म्हणून । तुम्हांकडे आले. पुढे शिवाजीचे पारिपत्य करण्यासाठी औरंगजेबाने राजा जयसिंग यास दक्षिणचे स्वारीवर पाठविले. स्वारीवर निघतांच जयसिंगाने १ केळुसकर पृ. २०४. २ हिंदुत्व पृ. ६०.३ केळुसकर पृ. २४७.
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/68
Appearance