५३ हिंदु राष्ट्रवाद । हा सिद्धांत कसा अचूक आहे ते पाहूं. पण तत्पूर्वी पहिल्या प्रकरणांत हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व ठरविणाच्या लक्षणांविषयीं जें निगमन काढले होते त्याकडे पुन्हा एकदां दृष्टिक्षेप करणे प्रस्तुत विषयाच्या अनुसंधानाच्या दृष्टीने इष्ट आहे. ‘सर्व राष्ट्रांना निरपवादपणे लागू पडेल अशी ‘राष्ट' या संज्ञेची व्याख्या करणें दुर्घट आहे. तथापि इतकें मात्र म्हणता येईल की, प्रदीर्घ काळापासून एकाद्या समाजांतील घटकांत एकत्वाची भावना नांदत आली असेल तर, त्या समाजास स्वतःला ‘राष्ट्र’ म्हणवून घेण्यास कांहींच प्रत्यवाय नाहीं. ह्या लक्षणानुसार हिंदुस्थानांत हिंदु हे राष्ट्र आहेत हा 'अभियोग मान्य होण्यासाठी आपणांस हिंदूलोकांत प्रदीर्घ काळापासून हिंदु म्हणून एकत्वाची भावना नांदत होती काय हे पाहिले पाहिजे. (१) हिंदुसमाजांतील एकत्वाची अविच्छिन्न जाणीव दाखविणारा ऐतिहासिक पुरावा. हिंदूचे मूळ निवासस्थान कोणतें होते, ते हिंदुस्थानात कोणत्या काळी स्थायिक झाले, कां हिंदुस्थान हीच त्यांची मूलभूमि होती, हे सर्व प्रश्न विवाद्य असून या ठिकाणी त्यांच्या विवेचनास हात घालणे अप्रस्तुत होईल. हिंदूचें मूल निवासस्थान उत्तरध्रुवासारखें हिंदुस्थानाबाहेरील असो, किंवा ते हिंदुस्थानच असो, त्यांच्या संस्कृतीचा पगडा बृहत् हिंदुस्थानावर फार प्राचीन काळापासून पडला होता याविषयी शंका नाहीं. नृपंद्रकुमार दत्त म्हणतात, ‘‘ ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे अलेक्झांडरचे स्वारीच्या वेळीं आर्यांचा प्रभाव लंका, तसेच हिंदुस्थानची अंतिम दक्षिण यांसह अखिल हिंदुस्थानावर पडला होता. यावरून आपण असे अनुमान करू शकतों कीं, सुमारे तेवीसरों
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/62
Appearance