Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९ इस्लामी राष्ट्रवाद रशिया, जर्मनी, इंग्लंड या देशांत निवास करीत असले तरी ज्यू हे जसे एक राष्ट्र आहेत, त्याचप्रमाणे सर्व जगभर पसरला असला तरी मुसलमान समाज हाही एकच राष्ट्र (millat) आहे. इस्लामी राष्ट्रीयत्वाला प्रादेशिक अथवा वांशिक मर्यादा नसल्याने मुसलमान मनुष्य, मग तो कुठेही रहात असो, वा कुठल्याही वंशाचा असो, तो वंशभक्तीपासून नि देशभक्तीपासून मुक्त असतो. त्याच्या निरनिराळ्या शासनसंस्था ह्या केवळ राज्यकारभाराच्या सोयीसाठी आहेत. या सर्व कारणांमुळे हिंदू किंवा इतर मुसलमानेतर आणि विशेष म्हणजे अल्-ही-किताब सुद्ध। नसलेले असे मुसलमानेतर यांचेसह मुसलमानांचे एखादें राष्ट्र असावें ही कल्पना मुसलमानी मनास अगदीं परकीय आहे.’१। मुस्लिम राष्ट्रीयत्वाची यथार्थ कल्पना येण्यासाठी हा उतारा नि:संशय उत्कृष्ट आहे. ह्यामुळे मुसलनानांच्या अहिन्दी दृष्टिकोनावर लख्ख प्रकाश पडतो. हा उतारा इतका स्वयंपूर्ण आहे की, तो वाचल्यावर अधिक पुराव्याची आवश्यकता उरतच नाही. ह्या उताण्याचा माथितार्थ असा की, मुसलमानांची राष्ट्रवादाची कल्पना पाश्चिमात्य अथवा पौवात्य यांपैकी कोणतीही नसून ती निव्वळ इस्लामची आहे. तिचा भूमीशीं, संस्कृतीशी, वा वंशाशीं जराही संबंध नाही. केवळ इस्लाममध्येच तिचा उगम नी लय आहे. यामुळेच जें जें इस्लामी नाही त्याच्याशी इस्लामी राष्ट्रवादाचा स्नेह होऊच शकत नाही. याचाच अर्थ मुसलमानांचा कोणत्याही परिस्थितींत हिंदी अथवा हिंदू यांपैकी कोणत्याही राष्ट्रवादाशीं विरोध येणे अटळ आहे. आणि म्हणूनच मुसलमान है जोंवर मुसलमान आहेत तोंवर, ते हिंदी अथवा हिंदू यांपैकी कोणत्याही राष्ट्रवादाच्या कक्षेत बसू शकत नाहीत, आणि यांपैकी कोणत्याही एका राष्ट्रवादाचा त्यांनी अंगिकार करण्याचा प्रयत्न करणे याचा अर्थ इस्लाम १ पंजाबी : कॉन्फेडरस ऑफ् इंडिया, पृ. ७१ ।