हिंदी राष्ट्रवाद . ३१ स्थानच्या राज्यघटनेच्या आराखड्यांतही अल्पसंख्यांक जमातींचे अस्तित्व दर्शविणारी चिन्हें होतीं. स्वीकृत राज्यघटनेत ते विभाग पुढे बारगळण्यात आले. पण त्यांत एक चतुराई करण्यात आली. मुसलमानांचे पहिल्यापासून जें प्रतिपादन होते की भाषा, लिपी आणि संस्कृति या दृष्टीने मुसलमान हे इतरांपासून निराळे आहेत, त्या प्रतिपादनास स्वीकृत घटनेतील विभाग २९ ने, मुसलमान नि इतर जमातींचे उघड नांव न घेतां, मान्यता देण्यात आली आहे. विभक्त-मतदार संघ राज्यघटनेतून काढून टाकण्यात आल्यामुळे पुन्हा एकदां ‘हिंदीराष्ट' या कल्पनेस जोर मिळाला. पण तो तितकाच ! कारण त्या कल्पनेची विफलता अत्यंत हिडिसपणे नि भीषणतेने दिसावी यासाठीच की काय, बंगालची कथा रक्ताने लिहिली गेली ! यानंतर परवां दिल्ली-करार झाला. ह्या कराराने पुनश्च खंडित हिंदुस्थानांत मुसलमान अल्पसंख्य झाले. हिंदीराष्टकल्पनेशी विसंगत असणा-या वरील कारणांची सोपान परंपरा आपल्यासमोर असतांना हिंदीराष्ट्रवाद स्वयंसिद्ध कसा मानावयाचा ? नुकतेच जयप्रकाश नारायण यांनी स्वत:च्या भूमिकेविषयी एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यामध्ये ते म्हणतात - ‘‘हिन्दुस्थान आणि पाकिस्तान हे दोन देश एकराष्ट्रीयत्वासारखा प्रश्न निरनिराळ्या भूमिकेवरून सोडवू लागले. काँग्रेसनें देशविच्छेदन जरी स्वीकारले तरी तिने द्विराष्टवादाला मान्यता कधींच दिली नाही. दोन्ही जमातींना समान अशा हिंदी राष्ट्रीयत्वावर तिचा विश्वास होता. दोन विनाशकारक गोष्टींपैकी कमी विनाशकारक म्हणून विच्छेदन तिने स्वीकारले होते. कारण १ राज्य घटना-आराखडाः विभाग २९२-२९९ २ दि संडे न्यूज़ ऑफ् इंडियाः दि. ७ मे. १९५०.
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/40
Appearance