पाश्चिमात्य राष्ट्रवाद २१ असाच कांहसा प्रकार स्कैंडिनेव्हिअन् देशांसंबंधीही दिसतो. याविषय नैशनलिझम् या ग्रंथांत (पृ. २२-२३) असे म्हटले आहे की, * तिन्ही स्कैन्डिनेव्हिअन् देशांतील लोकांची उत्पत्ति एकाच वंशापासून झालेली दिसते. आणि सुमारें खिस्तवर्ष १००० पावेतों ते सर्वजण, भाषेचे प्रादेशिक पोटभेद दुर्लक्षिल्यास, एकच भाषा बोलत असत. नॉर्वे नि स्वीडन् यांना पर्वतश्रेणीनें विभागिले असून त्या उभयतांना समुद्राने डेन्मार्कपासून वेगळे केलेले आहे. असे असल्याने, नि भिन्न भौतिक कारणांमुळे नि जलवायू (हवामान ) मुळे तेथील समाजांच्या आचारविचारांची धाटणी वेगवेगळी झाली. स्कैन्डिनेव्हियन् राष्ट्रीयत्वास ही गोष्ट नुसती मारक ठरली इतकेच नव्हे तर, त्यामुळे अत्यंत प्राचीन काळापासून प्रत्येकाचा पृथक् अहंकार जागृत केला गेला. इतिहासातील ‘व्हिकिंलग' ह्या काळखंडापासूनच नॉर्वेजियन् लोकांना आपण डॅनिश् लोकांपासून भिन्न आहोत, असे वाटू लागले होते. ही तिन्ही राष्ट्रं पवित्र रोमन साम्राज्यापासून दूर असल्यामुळे आणि वर सांगितलेल्या भौतिक कारणांमुळे त्यांच्यांत आपापल्या भिन्न राष्ट्रीयत्वाची जाणीव दृढ झाली होती; आणि तीही फ्रान्स नी इंग्लंड यांची राष्ट्रभावना जागृत होण्यापूर्वीच ! भरपूर पुराव्यावरून हे सिद्ध करिता येईल की, प्रत्येकाची आपण स्वतंत्र राष्ट्र असल्याची भावना खि. व. १०३० मध्येंच इतकी तीव्र झाली होती की, नॉर्वे नी डेन्मार्क यांना एका शासनसंस्थेच्या आधिपत्याखाली आणण्याचा कोणताही प्रयत्न अयशस्वी झाला असता. ही नॉर्वेजियन् राष्ट्रीयत्वाची धगधगणारी भावना १८१४ मध्ये अगदी उचंबळली होती. परंतु दंडशक्तीमुळे त्यांना स्वीडनशीं एकत्व मान्य करावे लागले. परंतु हें करीत असतांना लोकसभेच्या सभासदांनी आपल्या राष्ट्रासाठी निराळी राज्यघटना मिळविली; नीं केवळ राजा काय तो एक, इतकेच दोन्ही देशांपुरतें ऐक्यदर्शक चिन्ह त्यांनी मर्यादित केले. तरी पण अशी भागिदारीही उभयपक्षांस असमाधान
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/30
Appearance