Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाश्चिमात्य राष्ट्रवाद १५ प्रखर झाली. इंग्लंडच्या पावलांवर पाऊल ठेवून इतर देशांनी पण स्वसमजांत एकत्वाची भावना तीव्र करण्याचे यशस्वी प्रयत्न केले. हा सर्व यंत्रयुगाचा परिणाम आहे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे योग्य होणार नाहीं. या परिस्थतीचा युरोपीय मनावर दृढ संस्कार झाला असल्याने युरोपीय विचारांच्या व्याप्तीला नकळत पायबंद बसतो, आणि होते असे, कीं, राष्ट्र अथवा राष्ट्रीयत्व यांची सार्वकालिक, सार्वदेशीय आणि सर्वकष अशी व्याख्या होऊ शकत नाही. अशा अवस्थेत युरोपेतर, आणि जेथे यांत्रिक संस्कृति संपूर्ण पसरलेली नाही अशा समाजांनी ‘आम्ही पण राष्ट्र आहोत’ असे म्हटल्यास त्याचा निकष कोणता ? दुसरे असे की, ‘राष्ट्र’ पदाची प्राप्ति ही केवळ युरोपीय देशांचाच वारसा नाही, किंवा ईश्वराचे लाडके लेक म्हणून त्यांना प्राप्त झालेली ही कांहीं दैवी देणगी नाहीं. सर्वसामान्यपणे अथवा लौकिक अथीनें सांगावयाचे तर असे म्हणता येईल की, समाजांतील ऐक्य भावनेची ज्वलंत जाणीव म्हणजेच आधुनिक राष्ट्रीयत्व. वैज्ञानिक शोध पाश्चिमात्य देशांत प्रथम लागून जें सामाजिक स्थित्यंतर झाले त्यामुळे तेथील समाजांतील ऐक्य भावना दोन शतके आघीं चेतविली गेली इतकेच ! जातजातां हैं ही ध्यानांत ठेवले पाहिजे कीं, राष्ट-भावना सांप्रत जरी प्रखर दिसत असली तरी, आज राष्ट म्हणून संबोधिल्या जाणाच्या युरोपीय समाजांना राष्ट्रपदाची प्राप्ति यापूर्वीच झालेली आहे. तसेच आज जे जे समाज राष्ट म्हणून उभे ठाकलेले दिसतात त्या सर्वांना एकाच ऐतिहासिक क्षणीं राष्ट्रपदाची प्राप्ति झालेली नाहीं. युरोपच्या इतिहासाच्या अभ्यासाने ह्या विधानाची सत्यता चटकन् पटते. युरोपांतील राष्ट्र म्हणून मान्यता पावलेल्या प्रत्येक समाजास भिन्नकाळीं, भिन्न कारणांनी आणि भिन्न ऐतिहासिक परिस्थितींत राष्ट्र में पद लाभलेले आहे. यामुळेच वर उद्धृत केलेल्या अथवा इतर अशाच व्याख्यांच्या