१२३ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व सीमेंतील मूळ राष्ट्राचा राष्टिक झालाच पाहिजे असे नाहीं. दृष्टांत देऊन बोलावयाचे तर, हिंदू राष्ट्राचा राष्टिक नसलेला अहिंदु हा हिंदुस्थानच्या शासनसंस्थेचा नागरिक होऊ शकतो. हिंदुराष्ट्र ही कल्पना सांस्कृतिक असल्याने त्यांतील भागिदारी आज हिंदूसमाजापुरती मर्यादित आहे. पण याचा अर्थ असा जराही नाहीं की इतर अहिंदु जमातींस हिंदुस्थानांत स्थान नाहीं. नागरिकांच्या कर्तव्यांचे दायित्व त्यांनी नीट सांभाळले तर, अहिंदूंना हिंदुस्थानच्या शासनसंस्थेच्या नागरिकत्वाचे अधिकार हिंदूइतकेच मिळणार. त्याच्या आड‘हिंदुत्व’ म्हणजे हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व मुळीच येत नाही. हिंदुस्थानच्या शासनसंस्थेचे नागरिक होण्याचे नियम, आणि नागरिक झाल्यावर प्राप्त होणारे अधिकार नि येणारे दायित्व है। निबंध (कायदा) आणि राज्यघटना यांच्या कक्षेतील विषय आहेत. अशाप्रकारे हिंदुराष्ट्र आणि हिंदुशासनसंस्था या दोन कल्पना निश्चित भिन्न अर्थाच्या आहेत हे ध्यानांत घेतलें म्हणजे हिंदुराष्ट्र हो कल्पना जातीय भासणार नाही. तसेच सांप्रदायिक शासनसंस्थेची कल्पना हिंदु मनास अपरिचित आहे हे ध्यानात ठेविलें म्हणजे आजची निधमा शासनाची कल्पना कांहीं नवीन नाहीं हेंही स्पष्ट होते. पूर्वी जर शासन संस्था निधर्मी होती तर आज त्या दृष्टीने प्रगति ती काय झाली १ तो कल्पना जशी पूर्वी होती तशीच पुढे चालू असल्याने हिंदुराष्ट्रवादाच्या पुरस्काराने त्यास अपाय निश्चित होणार नाही, कारण हिंदुराष्टवादाचा निधर्मी शासनाशीं कांहीं विरोध नाही. | ।।। 4}
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/131
Appearance