Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार • ११९ कोणतीही विशिष्ट दैवतें अगर उपासना यांशी किंवा कोणत्याही एका पद्धतीच्या पारलौकिक कल्पनांशी निगडित नाही. नास्तिकापासून अघोरपंथीयांपावेतों विभिन्न पंथांचा समावेश हिंदूत होतो, आणि जडवादापासून आध्यात्मिक गूढवादापर्यंत निरनिराळ्या मतप्रणाली हिंदूतत्त्वज्ञनांत सामावल्या जातात.......हिंदी संघराज्याचे ‘हिंदूसंघ राज्य असे वर्णन केल्याने या संघाचे मुख्य वैशिष्ट्य दिद्गार्शित केले जाते....... कोणत्याही राज्यास हिन्दू हे उपपद लाविल्याने असहिष्णुता फैलावेल अगर भेदाभेद करण्यास उत्तेजन मिळेल असे म्हणण्यांत हिंदू जनतेचा व परंपरेचा उघडउघड अपमान केला जातो एवढेच नव्हे तर, हिन्दी संघराज्याने हिंदुत्व नाकारले तर त्या संघराज्यास धारणाशक्तीच उरणार नाही. पाकिस्तानाच्या निर्मितीनंतर हिंदी संघराज्यास भौगोलिक ऐक्य उरलें नाही. आणि प्रादेशिक ऐक्यभावना किंवा एकभाषीयत्व यांहूनही हिंदुत्वनिष्ठा अधिक प्रभावी आहे हे बंगाल नि पंजाब यांच्या फाळणीने सिद्ध झाले आहे. आसामी नि गुजराथी, पंजाबी नि तामीळ अशा संघराज्यांतील विभिन्न व दूरस्थ लोकसमूहांस एकत्र आणण्यास हिंदू परंपरेचा वारसा हेच एकमेव साधन आहे. मोठमोठ्या लोकसंघांस सतत संबंध, अथवा केवळ शेजार असली कारणे पुरत नाहींत. आपल्या विस्तीर्ण देशांतील हजारों वर्षांच्या इतिहासांत हिंदुत्वनिष्ठा ही कांहीं काळीं नि स्थळीं जरी लुप्तप्राय झालेली दिसली तरी, एकंदरींत, ती फार प्रभावी ठरली असून तिची धारणाशक्ति निर्विवाद आहे. नवीन संघराज्याने हिंदुत्व नाकारणे म्हणजे गतेतिहासाचा दाखला धिक्कारणे एवढेच नव्हे तर, भविष्यासही धोक्यांत घालण्यासारखे आहे.” । |- श्री. गाडगीळ यांचे हिंदुत्वाविषयीचे वरील विवेचन हिंदुत्वाची महत्ता नि शुद्धता स्पष्टपणे दर्शविते. ‘हिंदुत्वाचा त्याग करणे' हैं। भारताच्या भविष्याला धोक्यांत घालण्यासारखे आहे' हे श्री गाडगीळ यांचे विधान मननीय नाहीं असें कोण म्हणेल ? असो.