मार्क्सवाद आणि बोल्शेव्हिक रशिया १०९ रशियन नेत्यांच्या दृष्टिकोनांत किती अंतर पडलें आहे याविषयींचा परामर्ष घेतांना मॉरिस हिंडस' म्हणतो की, आपल्या मताच्या समर्थनार्थ तिनें भिंतीवरील चित्राकडे अंगुलिनिर्देश केला. १८१२ मध्ये नेपोलियनचा पराभव करणाच्या कुटुझाव सेनापतीचें तें चित्र होते. त्याखाली तांबड्या भडक अक्षरांत स्टॅलिनचे एक वाक्य होते| ‘आपल्या महान पूर्वजांची दैदीप्यमान स्मृति या युद्धांत तुम्हांस । स्फूर्तिदायक ठरो. स्टॅलिनने निर्देश केलेल्या महान् पूर्वजांचीं नांवें त्याच्या ७ नोव्हेंबर १९४१ च्या भाषणांत आढळतात ती अशी : अलेक्झांडर नेव्हेस्की, डिमिटी डोनस्काय् , कुझमा मिनिन, डिमिटी पोझार्की, अलेक्झांडर सुव्होझाव, मिखाइल कुटुझाव. यांपैकी एकहीजण कामगार वा शेतकरी नाही. कुझ्मा मिनिन वगळल्यास इतर सर्व राजपुत्र होते. आणि कुझ्मा मिनिन व्यापारी होता. ह्या शूर पुरुषांनी रशियन सेनेस विजयाप्रत नेले, आणि रशियाच्या इतिहासातील अत्यंत बिकट काळीं परकीयांच्या विजयापासून नि परकीय दास्यापासून राशयास मुक्त ठेविलें. रशियन दृष्टिकोनाचा परामर्ष घेतांना मॉरिस हिंडस ‘रशिया गोज् रशियन' ह्या प्रकरणांत (पृ. ९८) म्हणतो की, ग्राँझी या गावी दोन लहानशी पुस्तकें मी विकत घेतली. त्यांपैकी एक व्ही पेन्हाव नामक लेखकाचे ‘पीटर दि फस्र्ट' या नांवाचे होते. ह्या पुस्तकांतील पहिल्या दोन पानांवर पुढील शब्दप्रयोग मला आढळले * ज्यांत थोर रशियन जनतेच्या आत्मशक्तीचें केंद्रिकरण झाले आहे अशा महान् रशियन देशभक्तांच्या पथकांत......शक्तिशाली रशियन लोकांत......पीटरच्या नेतृत्वाखालील रशिया.......रशियन लोकांस अभिमानास्पद अशी सेना पीटरने निर्माण केली. आधुनिक रशियन सैन्य हैं. तिचेच फळ होय. १ मॉरिस हिंडस : मदर रशिया, पृ. ९३
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/118
Appearance