Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व वादाचा विजय झाला; आणि त्याच्याच पायावर राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय धोरणे आखली जाऊ लागली. रशियाच्या नवराज्यांतील मानवाविषयी बोलतांना गॉर्कीने १९२७ मध्ये म्हटले होते की, ‘अभिनव शासनसंस्थेचा निर्माता असा हा नूतन रशियन मानव माझ्या जीवनाचा आनंद आणि अभिमानाचे स्थान आहे. अशा प्रकृतीचा मानव भूतलावर यापूर्वी कधीही निर्माण झाला नव्हता. परदेशांतून रशियांत येणा-यांविषयीं वॉरकेनॉव् याने आपल्या ‘ दि कम्युनिस्ट इंटरनॅशनल' या ग्रंथांत १९३८ मध्ये लिहिलें कीं, ‘ परकीय आणि आश्रयार्थी कम्युनिस्ट मॉस्कोस ‘लाल मक्का' समजून त्याकडे खेचले जात. परंतु आतां निराशेच्या पोटी त्यांच्या ध्यानात आले की, ‘कॉमिन्टर्न'चाही उपयोग संपूर्णपणे रशियन परराष्ट्रीय धोरणाचे साधन म्हणून करण्यात येऊ लागला आहे.' अशाच प्रकारचा आक्षेप युगोस्लाव्हियाने रशिया आणि ‘कॉमिनफार्म'वर केला आहे. परंतु हे आक्षेप खोटे आहेत असे बोल्शेव्हिक नेत्यांकडून सांगण्यात येते. युगोस्लाव्हियाची सध्यां कशी परिस्थिति झाली आहे हे प्रसिद्धच आहे. ह्याच बाबत वर्थ नांवाच्या लेखकाचा ‘नों कलोनियल् एक्स्प्लाइटेशन् बाय दी क्रेमलिन्' हा लेख फार मननीय आहे. बोल्शेव्हिक रशियावर त्या लेखाने लहानसा, पण नवीन, प्रकाशकिरण पडतो. देशभक्ति, पितृभूमि यांसारख्या आतांपावेतों प्रतिगामी म्हणून तिरस्कृत समजल्या गेलेल्या शब्दांनीच आतां वर्तमानपत्रांचे स्तंभ भरले जाऊ लागले. पूर्वीच्या शूर रशियन राष्ट्र पुरुषांच्या चित्रांशेजारीच क्रांतिकारक समाजवादी नेत्यांची चित्रे ठेवण्यात येऊ लागली. सरतेशेवट १ संडे न्यूज् आफ् इंडिया : ९ ऑक्टो. १९४९