Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मार्क्सवाद आणि बोल्शेव्हिक राशिया ९७ सामान्य लोक, जमिनदार आणि भूदास, सहकारी संस्थेचा सभासद आणि रोजकामदार, थोडक्यांत म्हणजे पिळणारे आणि पिळले जाणारे हे सतत विरोधी भूमिकेत असत. कांहीं वेळां उघड उघड, तर कांहीं वेळां गुप्तपणे, परंतु सातत्यानें हैं वर्गयुद्ध चालू राहिले. प्रत्येक वेळी या युद्धाचा शेवट एक तर क्रांतिकारक नवसमाजाच्या निर्मितीत होई, किंवा • युद्धाय कृतनिश्चय' असलेल्या दोन्हीही पक्षांच्या नाशांतही होई. इतिहासाच्या प्राचीन युगांत जवळ जवळ प्रत्येक ठिकाणी आपणांस समाजाची रचना संमिश्र अशी अनेक थरांत झालेली आढळते, आणि सामाजिक श्रेणींचा क्रमही अनेक प्रकारचा असे, प्राचीन रोममध्ये आपणांस कुलीन सरदार, दरकदार, सामान्य जनता आणि दास असा समाजाच्या स्थितीचा क्रम आढळतो. मध्ययुगांत जमिनदार नी त्याचे कुळ, सहकारी संस्थेचा भागिदार नी रोज कामदार, सेवक, भूदास असा क्रम दिसतो. आणि पुनः या वर्गांमध्येही आणखी गौण वर्गवारी असतेच.

  • आधुनिक बुझ्व समाजाचा उद्भव हा जमिनदारी पद्धतीच्या समाजाच्या नाशांतूनच झालेला आहे. या समाजाने वर्गविग्रह नष्ट केले नाहींत. उलट त्याने जुन्याऐवजी नवीन वर्ग, गरीब जनतेस पिळण्याचे नवीन प्रकार आणि कलहाच्या अभिनव पद्धति स्थापित केल्या आहेत.

आपल्या सध्यांच्या युगास ‘बुर्खा युग' असे नामाभिधान देतां येईल. ह्या युगाचे एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. या युगाने वर्गविग्रहाचा मार्ग सुकर केला आहे. समाजाच्या एकतेत भेद पडून, त्यांत दोन मोठे । विरोधी वर्ग निर्माण झाले आहेत. शत्रुत्वाच्या भावनेने एकमेकांसमोर उभे ठाकलेले हे वर्ग म्हणजे बुझ्व आणि कामकरी होत.” १ मॅनिफेस्टोः पृ. १११