पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/90

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हर्ष राज्यश्रीच्या शोधास निघतो ५७ तेव्हां रुद्रदामनने पहल्लवांपैकी कुलैपाचा पुत्र सुदिशाखा यास सौराष्ट्र व आनर्त प्रदेशाचा सुभेदार नेमले. त्याने आपल्या निःस्पृह, सचोटीच्या, क्षमशील व कर्तृत्ववान् कारभाराने प्रजेचे प्रेम संपादन केले व अखेर रुद्रदामनाच्या अनुज्ञेप्रमाणे बंधारा बांधण्याचे काम हाती घेऊन ते पुरे केले. | [ या वर्णनांत रुद्रदामनला लावलेली पुष्कळ विशेषणे अतिशयोक्तिपूर्ण असण्याचा संभव आहे. पण जेथे तपशीलाचा उल्लेख करून विधान केलेले असते तेथे ते ऐतिहासिक सत्य असण्याचा संभव अधिक. वरील उदाहरणांत त्याने व्याकरण, संगीत, तर्क इत्यादि शास्त्रांवर प्रभुत्व मिळविले आहे हे विशेषण अतिशयोक्तीचे असेल पण ‘दक्षिणपथशातकर्णीचा दोनदां पराभव केला' हे विधान काल्पनिक असण्याचा संभव कमी. हा संस्कृत शिलालेख जागजागी तुटलेला व अस्पष्ट असा आहे. तेथील अक्षरन् अक्षर लावून वाचण्यासाठी पं. भगवानलाल इंद्राजी, डॉ. बुल्हर बगैरे अनेक विद्वानांचे श्रम व संशोधनशक्ति खर्ची पडली. आपले महाराष्ट्रांतील डॉ. भांडारकर यांनीहि हे कार्य केले. अशा शिलालेखांचे ठसे उमटवन त्यांचे फोटो काढून, त्यांचे रोमन लिपीत लिप्यन्तर करून त्यावर टीका लिहून व प्रारंभी प्रस्ताव परिचय करून ते एपिग्राफिका इंडिकाच्या अनेक खंडांतून प्रसिद्ध झाले आहेत. भारताचा प्राचीन इतिहास संगतवार जुळविण्यासाठी या पंडितांचे प्राथमिक श्रम खर्ची पडले म्हणूनच ते काम इतके सुगम झालें.] अभ्यास:-- १ सुदर्शन तलावाची माहिती तीन परिच्छेदांत तुमच्या भाषेत लिहा. २. शक मूळचे कोठले ? रुद्रदामनसंबंधी दहा ओळी लिहा. ३० । । । हर्ष राज्यश्रीच्या शोधास निघतो [ वत्स कुळांत कुबेर नांवाच्या सद्गुणी विद्वान् ब्राह्मणास अच्युत, ईशान, हर आणि पाशुपत असे चार मुलगे होते. त्यांतील पाशुपताला अर्थपति नांवाचा मुलगा झाला. अर्थपतीला अकरा मुलगे होते. त्यांपैकी एक चित्रभानु होय. त्याच्या मुलाचे नांव बाण. बाण अगदी लहान असतांच त्याची आई वारली व बापाने त्याचे ।। .. प्रेमाने पालन केले. चौदाव्या वर्षी त्याचा बापहि वारला आणि बाण