पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/179

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सय्यद बंधूची योग्यता १४९ दाखविली. सैनिक तिकडे धांवले. ही परिस्थिति पाहून राजमाता, राणी शहाजादी व इतर पहिल्या दर्जाच्या स्त्रिया या राजाच्या साह्यार्थ धांवल्या; त्यांनी त्याच्या शरीराभोंवतीं कडे केले व डोळ्यांत अश्रु आणून सैनिकांची प्रार्थना नि विनवणी केली ! पण अशा प्रसंगी या अश्रूचा काय उपयोग होणार? त्या शिपायांनी थोडी हिसकाहिसकी करून त्या स्त्रियांपासून बादशाहास सोडविले व त्याला जमिनीवरून फरफटत ओढीत 'वरच्या मजल्यावरील अंधारकोठडीत फेकलें.'••••बादशाही व्यक्तींचा इतका अपमान कवींच करण्यांत आला नव्हता ! (अत्यंत) असभ्यतेने नि धसमुसळेपणाने हे सर्व (कृत्य) करण्यांत आलें ! ४४ ।। सय्यद बंधूची योग्यता | [शर्माकृत क्रेसंट इन इंडिया पृ. ६२६ खाफीखानाच्या लेखनाबरून] । ......वृत्तांत वर्णन करीत असतांना, या लेखणीने दोन्ही बंधू चेवर टीका करण्यांत आली आहे. ते परिस्थितीला बळी पडले, त्यांच्यावरची टीका आतां कांहीं दुरुस्त करता येत नाही, पण त्यांना अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या चारित्र्यांतील विशेष आकर्षक गुण, न्यायप्रियता नि औदार्य याविषयी दोन शब्द लिहितो ...... | दोघेहि बंधू आपल्या काळांत मानव जातीबद्दल त्यांना वाटणा-या। सहिष्णुता नि उदारता याविषयी प्रसिद्ध होते. ज्या प्रदेशांतील रहिवाशांत बंडखोरी आणि आप्पलपोटेपणा नव्हता, त्यांनी सय्यदांच्या राज्याविषयी तक्रार केली नाही. विद्वज्जनांविषयी सहानुभूति आणि औदार्य दाखविण्यांत, हुसेन अलीखान हा वडील भावापेक्षा अधिक होता. आणि त्या काळास अनुरूप असा हतीम होता. अनेकांचे सौख्य हे त्याने दिलेला शिधा आणि अन्न यांवर अवलंबून होते. औरंगबादला दुष्काळ पडला त्या वेळी पुष्कळ पैसा आणि धान्य गरीबांना आणि विद्वानांना वाटण्याची त्याने योजना केली. औरंगबादच्या पाण्याच्या सांठ्याची पद्धति त्यानेच सुरू केली..... उन्हाळ्यांत पाणी दुर्मिळ झाल्याने नागरिकांचे होणारे हाल यामुळे वाचत. त्यांनी [ ६५