पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृथ्वीराजाचा जय आणि पराजय हातांत भाला घेऊन सुलतानाने हल्ला केला. गोविंदराजहि सज्ज होताच, आणि मग जणू प्रति रस्तुमच भासणाच्या त्या सुलतानाने मृगराजाच्या आविर्भावाने रायाच्या तोंडांत भाला खुपसला आणि त्याचे दोन दांत त्याच्याच घशांत घातले. रायानेहि उलट प्रतिकार करून शत्रूच्या दंडावर मोठी जखम केली. सुलतानाने आपला घोडा मागे घेतला, आणि जरा वाजूस गेला. घोड्याच्या पाठीवर बसतां येणेंहि अशक्य झालें इतका त्यो जखमेमुळे त्यास त्रास होत होता. मुसलमानी सैन्य पळू लागले. कोणी कोणाचे ऐकेना अशी स्थिति झाली. सुलतान खाली पडत असतांना चाणाक्ष व तरुण खिलजीने त्याच्या घोड्यावर उडी मारून त्यास सांवरले आणि लढाईच्या धुमश्चक्रींतून त्यास दूर नेले. सुलतान दिसेनासा होतांच मुसलमानी सैन्यांत एकच हाहाःकार उडाला. विजयी सैन्याकडून चाललेला पाठलाग थांबेपर्यंत ते सैन्य पळत होते. घोरप्रान्तांतील कांहीं सरदार नि तरुण सैनिक यांनी जाणलें कीं, सिंहाची छाती असलेला हा खिलजी तरुण आपला पुढारी आहे. तो दिसतांच ते त्याच्याभोंवतीं जमा झाले; आणि भाल्याचा कामचलाऊ मेणा बनवून सुलतानाला त्यांनी त्यांतूनच स्नानस्थलापर्यंत नेले. त्याला पाहून सैन्याला थोडासा धीर आला आणि सुलतानाच्या मनांतील मुसलमानी धर्माबद्दलची श्रद्धा अधिक स्थिर झाली. चोहोकडे विखुरलेले सैन्य त्याने एकत्र केलें; आणि तो इस्लाम प्रदेशाकडे परत गेला. सरहिंद येथील किल्ल्यांत त्याने काजी तुघलक यांस ठेवले. पृथ्वीराजाने पुढे चाल करून या किल्ल्यास वेढा घातला. हा वेढा तेरा महिने चालू होता. | * । पुढील वर्षी नवीन सैन्य तयार करून आपल्या पराभवाचा सूड घेण्यासाठीं सुलतान हिंदुस्थानांत आला. तोलखच्या डोंगराळ प्रदेशांतील विश्वासू व प्रमुख व्यक्तींपैकीं एक व्यक्ति या सैन्यांत होती. तिने मला असे सांगितले कीं, एकूण सैन्यांत १,२०,००० चिलखती घोडेस्वार होते. सहिदच्या किल्ल्यापाशीं सुलतान पोहोंचण्यापूर्वी तो किल्ला शरण गेलेला होता ! । तराईच्या जवळच शत्रूचा तळ होता. सुलतानाने आपली युद्धयोजना आखली. त्याने सैन्यांतील मुख्य भाग, निशाणे, तंबू, हत्ती व कित्येक सैनिक [७