पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/115

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ४२:: : नांदगांचा अर्धमराठी शिलालेख [ प्रस्तुत लेख सहा ओळींचा असून त्याने २ फूट ५ इं. रुंद व ९ इंच उंच इतकी जागा व्यापली आहे. लेखाच्या आरंभीचा भाग संस्कृतांत असून नंतरचा मराठीत आहे. 'ख' बद्दल 'ष' चा उपयोग केला आहे. लेखाचा काल शक ११७७ आनंद संवत्सर (इ. स. १२५५-५६) आहे. त्यांत श्रीमत् प्रौढप्रताप चक्रवर्ती श्रीकान्द्रिदेव (कृष्ण देवराव यादव) याचा उल्लेख आहे. | नांदगांव में खेडे वहाडांत अमरावतीच्या ईशान्येस २० मलांवर वसलें आहे. गावाबाहेर एका टेकडीवर खंडेश्वर, देवी व नरसिंह या तीन देवतांचा मिळून एक समान सभामंडप आहे. या देवालयाच्या बाहेरच्या भिंतीवर प्रस्तुत शिलालेख कोरलेला आहे. | खंडेश्वराच्या देवळांत लाखोली किंवा लक्ष फुलें देवाला वाहण्याकरिता ज्यांनीं गद्याण नामक नाणी दिली त्या दहा लोकांची नांवें लेखांत आली आहेत. गद्याण नांवाचे सोन्याचे नाणे त्या वेळी महाराष्ट्रांत प्रचलित होते. ते ४८ गुजं वजनाचे किंवा अधेलीच्या वजनाचे सोन्याचे नाणे होते असे | दिसते. लेखांत ग १ असे म्हटले आहे, त्याचा अर्थ गद्याण १, होय. पूर्वीची नाणी, परंपरा व यादवकालीन मराठी भाषेची कांहीं कल्पना ' येण्यासाठी हा लेख येथे दिला आहे. त्यांतील सहा ओळी दर्शविण्यासाठी (प्रारंभीं कंसांत आंकडा घातला आहे. ही सर्व माहिती, भा. इ. सं. मंडळ, त्रैमासिक वर्ष २८ अंक १-२, पृष्ठ ८ ते १.१ वर विस्ताराने दिलेली आहे.] (१) ॐ स्वस्ति [*] श्री सकु ११७७ आनंदसंवत्सरेअद्यह श्रीमत् प्रौढप्रताप चक्रवर्ती श्रीका-- (२) न्हिदेवविजयराज्ये तत्पादपद्मोपजीवी समस्तभरभारनिरूपित श्रीपांचो(३) लिनि..तन्निरूपिवितद्रवीडी वडवो श्रीसोमदेवदत्त लाषौलिए ग वडउ पं १॥ (४) डिलें दत्त लाषौए ग १ [*] आसुगिनायकें दत्त लाषौलिए ग १ [*] ढों (५) ढिए दत्त लाषौलिए ग ? [*] भोपतिनायकें दत्त लाषौए ग [*] धनैएं दत्त लाषौलिए ग १ [*] (६) | ना] गैएं [द] त लाषौए ग १ [*] प्रति (?) श्रीठाकुरेदत्त लाषौलिए ग १. [*] ढोडडदाऊ दत्त द्वि लाषौए [*]. अभ्यास :--१. लाखोली देणा-यांचों नांवें सांगा व गद्याणासंबंधी माहिती लिहा. २. सर्व लेख आजच्या मराठीत लिहिण्याचा यत्न करा. १. बडवा -पुआरी. २. लाखोली.