पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास त्यास अटकेअलीकडे कांही थोडीशी जागा बसावयास देऊन अटकपार काबूल पिशाबरचा सुभा देऊंअबदालीची फौज अबदुल समदखान सरहिंदत होता तो पाडाव होऊन सरकारांत आहे तो व आणखी या प्रान्तींची फौज इरानी मोगल येऊन देऊन मशारनिल्हेची रवानगी करितो. हे तिकडील बंदोबस्ताची पैरवी* करितीलस्वामींचे पुण्यप्रतापें अबदालीस जोरा पोहोचावून तंबी करितील, पारपत्य उत्तम प्रकारे करून अटकेपार अंमल बसवितील. लाहोर प्रांतीं राजश्री रेनको अनाजी व रायाजी सखदेव ऐसे ठेविले. गोपाळराव गणेश यांचाही पैगाम आहेतेही राहातीलयांजशिवाय आणखी किरकोळी पथकें ठेवितों. स्वामीचे पुण्यप्रतायें बंदोबस्त उत्तमच होईल. पुढे स्वदस्तुर इरानचे पातशहाचे कागदही आम्हांस व मल्हाररावार आले होते कीं, लवकर कंधारेस यात्री आणि त्यांचे पारपत्य करून अटकेची रहीमखान स्वामींनी पाठविला, त्यास देतों. फौज वगैरे थोडेबहुत सी करितो. काबूल व कंदहार हे अटकेपारचे सुभे हिदुस्थानकडे अकबरापासून आलमगीर पावेतों होते. ते आम्हीं विलायतेंत६ कां द्यावे ? यास्तव तूतं येथे सुभे देतों. त्यासही फारसे या सुभ्यांची दरकार नसेल. तो इरानचा अंमल करीलआम्ही कंदाहार पावतो अंमल बसवून नूतं त्यास गोडच जाव पाठ विणार आहोंलटी व जंबूचा राजा व काश्मीर वगैरे तमाम वकील आले आहेत. मामलत थोडीबहुत अटके अलीकडे करीत आहोंपलिकडील तूतं होत नाही. खटपटमात्र होईल. तूर्त तांतडीमुळे जें होईल तें करितों. पुढील स्वारीस जो कोणी सरदार मातबर येईल तो बंदोबस्त करील. मुलूख दो च॥ करोडीचा वसुली परंतु जमीदार मवास मोठे मोठे आहेत. आम्हीं नांवास मात्र खंडणी करितो. परंतु जेणें पंचवीस लक्षांच मुलूख, तेथे एक दोन लक देणेंच कठिण आहेत. तूर्त माघारें फिरावयाचा डौली स्वामींचे आज्ञेवरून घरिला आहे. त्याजमुळे जें होतें तेंच करितो. तटी’ लावीत नाहीं तूर्त या प्रान्त आदिना वेग मोगल मातबर व प्रामाणिक आहेत्याजवरच सारा बंदबस्त. संधान. ६ बादशाही मुलुखांत. ७ दंगेखोर. ८ इरादा. ९ हट्ट. ६२ ]