पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Wwwwwwwwww MAMMALAM हिंदी राष्ट्राचे भवितव्य.


--- ब्रिटिश भांडवलशाहीने आपल्यामध्ये फैलावून दिलेल्या समाजाच्या नव्या द्रव्यांचा फायदा हिंदी जनतेला सहजासहजी मिळण्यासारखा नाही. तसा तो मिळण्यासाठी एक तर तत्पूर्वी, इंग्लंडांतील अधिकारारूढ वर्गाच्या जागी कामगारांची स्थापना झाली पाहिजे, किंवा इंग्रजांचे जे आपण होऊन अजीवात झुगारून देण्याइतके हिंदी लोकच समर्थ झाले पाहिजेत. पण काही झाले तरी, ज्या देशांतील सौम्यस्वभावाचे अगदी हलक्या वर्गातीलसुद्धा रहिवाशी, प्रिन्स साल्टिकोव्ह याने म्हटल्याप्रमाणे, * नावाजलेल्या इटालियन नागरिकांपेक्षाहि अधिक सभ्य च अधिक कलावन्त' असे आहेत, ज्यांची शरणागति देखील एक प्रकारे शांत आणि ओजस्वी असते, ज्यांनी आपसांतील भेदभाव असतांनाहि ब्रिटिश अधिका-यांना प्रसंगी आपल्या शौर्याने चकित करून सोडले, ज्यांचा देश हो । आपली सर्वांची भापा व धर्म यांचे मूलस्थान आहे आणि ज्यांच्या जाठ लोकांत प्राचीन जर्मनांचे व ब्राह्मणात प्राचीन ग्रीकांचे प्रतीत पाहावयास मिळते, त्यांच्या या महान आणि मनोवेधक देशाचे संजीवन लौकरच, किंवा थोडे उशीरा का होईना, पण होणारच होणार, अशा अपेक्षा करण्यास मुळीच हरकत नाही.

कार्ल माक्र्स. ( * लेटस ऑन इंडिया,' १८५३, पृष्ठ ५९) MAN Ayyy•AAAAAAA